
‘कल हो ना हो’, ‘वीर-जारा’ आणि ‘दिल चाहता है’ सारख्या चित्रपटांमध्ये भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री प्रीती झिंटा कोणत्याना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असते. पण अभिनेत्री चित्रपटांपेक्षाही तिच्या वैयक्तिक कारणांमुळे जास्त चर्चेत असते. सर्वांना माहितच असेल की प्रीतीने जीन गुडइनफसोबत लग्न केल्यानंतर ती अमेरिकेतच राहते. प्रीतीला दोन जुळी मुले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर चाहत्यांसोबत अलिकडेच झालेल्या आस्क मी एनीथिंग सत्रात, प्रीतीने मातृत्व, सांस्कृतिक ओळख आणि पुढच्या पिढीला परंपरा देण्याची तिची इच्छा याबद्दल ती बोलली. दरम्यान, ती तिच्या मुलांना कसे वाढवत आहे हे देखील उघड केले.
प्रीती झिंटाला एका युजरने तिच्या मुलांच्या संगोपनाबाबत एक गोष्ट विचारली. त्यावेळी तिने मुलांच्या संगोपणाबाबत तिने आणि तिचे पती जीन गुडइनफने त्यांच्या मुलांना हिंदू म्हणून वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तिने म्हटलं आहे की परदेशात वाढताना त्यांची मुले भारतीय वारसा विसरणार नाहीत याच पद्धतीने ते त्यांना वाढवणार आहेत.
प्रीती झिंटाचा मुलांबाबतचा निर्णय
एका चाहत्याला उत्तर देताना प्रीती झिंटाने लिहिले की, ‘आई झाल्यानंतर आणि परदेशात राहिल्यानंतर, माझ्या मुलांनी ते अर्धे भारतीय आहेत हे विसरू नये असे मला वाटतं. माझे पती नास्तिक असले तरीही आमच्या मुलांना मात्र हिंदू म्हणून वाढवणार आहोत.’
प्रीती मुलांना भारतीय संस्कृतीशी जोडत आहे.
प्रीतीने तिच्या मुलांना भारतीय संस्कृतीशी जोडून ठेवल्याचा तिला आनंद असल्याचे सांगून, हा निर्णय किती वैयक्तिक आणि मनापासून घेतला आहे हे देखील तिने सांगितले. जो तिच्या संस्कृतीवरील प्रेम आणि अभिमानात रुजलेला आहे. तिने सांगितले की तिच्या मुलांसोबत भारतीय परंपरा आणि मूल्ये शेअर करणे तिच्यासाठी किती महत्त्वाचे आहे, जरी तिचे मुले भारतापासून खूप दूर वाढत असली तरीही प्रीतीने मुलांची भारतीय संस्कृतींची नाळ जोडून ठेवली आहे.
सरोगसीद्वारे जुळी मुले
2021 मध्ये सरोगसीद्वारे या जोडप्याने त्यांच्या जुळ्या मुलांचे जय आणि जिया यांचे स्वागत केले. प्रीती आणि जीन यांनी 29 फेब्रुवारी 2016 रोजी लॉस एंजेलिसमध्ये लग्न केले. तेव्हापासून, अभिनेत्री अमेरिकेत राहत आहे. ती भारतात तिच्या कामासह परदेशात तिचे वैयक्तिक जीवन सांभाळत आहे.
प्रीती झिंटा आयपीएलसाठी भारतात आली होती
जरी प्रीती झिंटा अमेरिकेत राहत असली तरी ती वारंवार भारताला भेट देते, विशेषतः आयपीएल हंगामात. ती पंजाब किंग्ज संघाची सह-मालक आहे आणि तिच्या कामकाजात पूर्ण भाग घेते, अगदी स्टँडवरून तिच्या संघाचा जयजयकार देखील करते.