ना अमिताभ, ना शक्ती कपूर! हा आहे 900 चित्रपट देणारा सुपरस्टार, एका वर्षात दिले 39 चित्रपट

Indian Actor: भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये दाक्षिणात्य आणि बॉलिवूड या दोन्ही इंडस्ट्रींचे मोठे योगदान आहे. अभिनेत्यांनी आपल्या इंडस्ट्रीला पुढे नेण्यासाठी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम केले आहेत. आज आपण अशा एका अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत, ज्याने आपल्या करिअरमध्ये 900 चित्रपटांमध्ये काम केले. त्याचबरोबर, एकाच अभिनेत्रीसोबत 130 चित्रपटांमध्ये दिसला.

ना अमिताभ, ना शक्ती कपूर! हा आहे 900 चित्रपट देणारा सुपरस्टार, एका वर्षात दिले 39 चित्रपट
Amitabh Bachchan
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 16, 2025 | 4:56 PM

दाक्षिणात्य असो वा बॉलिवूड, अभिनेत्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला पुढे नेण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. आज भलेही अनेक सुपरस्टार्स आपल्यात नसले, तरी त्यांनी आपल्या चित्रपटांमधून अनेक विक्रम प्रस्थापित केले आणि मोडले देखील. आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याने 900 चित्रपटांमध्ये काम केले होते. हा अभिनेता अमिताभ बच्चन, धर्मेंद्र किंवा मिथुन चक्रवर्तीही नाही. अगदी 700 चित्रपट करणारा शक्त कपूरसुद्धा या अभिनेत्याने मागे टाकले आहे. या अभिनेत्याने 1952 मध्ये ‘मारुमाकल’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले होते. मात्र, वयाच्या 62व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. कोण आहे हा अभिनेता? चला जाणून घेऊया…

आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलत आहोत तो मल्याळम अभिनेता प्रेम नजीर आहे. ज्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावशाली अभिनेता मानले जाते. 900 चित्रपट करणाऱ्या या अभिनेत्याला केरळ राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. इतकेच नाही, तर त्यांना पद्म भूषण हा सन्मानही मिळाला होता.

किती चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेतून मिळवली प्रसिद्धी

प्रेम नजीर यांच्या करिअरमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच मन जिंकल. त्यांच्या चित्रपटांची यादी खूप मोठी आहे. त्यामध्ये मुरप्पेन्नु, उद्योगस्थ, इरुट्टिन्टे अथमवु, कल्लिचेल्लम्मा, CID नजीर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या अभिनेत्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही बनवला आहे. त्याने एकच अभिनेत्री शीला यांच्यासोबत 130 चित्रपटांमध्ये काम केले होते. इतकेच नाही, तर 720 चित्रपटांमध्ये ते मुख्य नायक म्हणून काम केले. या अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये 85 अभिनेत्रींसोबत काम केले आहे. तसेच, एका वर्षात 39 चित्रपट करून विक्रम केला होता.

Viral Video: AC कोचमध्ये सिगारेट ओढत होती मुलगी, लोकांनी विरोध करताच…

या अभिनेत्याने आपल्या करिअरची सुरुवात खूप आधी केली होती. पण मधेच काही काळ त्यांना रुपेरी पडद्यापासून लांब रहावा लागले होते. मात्र, 1950 मध्ये त्याने सामाजिक आणि धार्मिक अन्यायावर आधारित चित्रपट बनवले, ज्यामुळे त लोकांमध्ये खूप लोकप्रिय ठरले. 1956 ते 1976 या काळात त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. इतकेच नाही, तर त्या मल्याळम चित्रपटसृष्टीला आपले सर्वोत्तम सिनेमे दिले. ‘इरुट्टिन्टे अथमवु’ या चित्रपटामुळे त भारतातील उत्कृष्ट कलाकारांपैकी एक ठरल. शीला ही त्याच्यासाठी सर्वात लकी अभिनेत्री मानली जात होती. पण 1980 नंतर त सहाय्यक भूमिकांमध्ये दिसू लागल. 1985 मध्ये आलेल्या ‘वेल्लारिक्का पट्टानम’ या चित्रपटात तो शेवटच्या वेळी नायकाच्या भूमिकेत दिसला होता. त्याचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट ‘कदथनादन अंबाडी’ होता, ज्यामध्ये त्याने मोहनलालसोबत काम केले होते.