
मुंबई : प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. प्रियांका चोप्रा ही विदेशात असूनही आपल्या चाहत्यांच्या कायमच संपर्कात दिसते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने मुलगी मालती मेरी हिच्यासोबतचे अत्यंत खास फोटो (Photo) हे सोशल मीडियावर शेअर केले. प्रियांका चोप्रा हिची मुलगी मालती ही अत्यंत गोड असून प्रियांका कायमच आपल्या मुलीसोबत वेळ घालवताना दिसते.
काही दिवसांपूर्वीच निक जोनस याच्या एका लाईव्ह शोमधील व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्रा आणि मालती या शोमध्ये पोहचल्या होत्या. आपल्या वडिलांना बघताच स्टेजवर जाण्याचा प्रयत्न करताना मालती मेरी ही दिसली. लोकांना प्रियांका चोप्रा हिच्या मुलीचा हा व्हिडीओ खूप जास्त आवडला. यावर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसले.
प्रियांका चोप्रा हिने नुकताच एक अत्यंत खास अशी पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर केलीये. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये प्रियांका चोप्रा ही आपली बहीण मनारा चोप्रा हिचा सपोर्ट करताना दिसतंय. मनारा चोप्रा ही सध्या बिग बाॅस 17 च्या घरात असून घरातील इतर सदस्य हे मनारा हिला टार्गेट करताना दिसत आहेत. मनारा रडताना देखील दिसली.
आता मनारा हिच्या सपोर्टसाठी थेट प्रियांका चोप्रा हिच मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय. प्रियांका चोप्रा हिने एक जुना फोटो इंस्टा स्टोरीवर शेअर केलाय. यामध्ये प्रियांका चोप्रा आणि मनारा दिसत आहेत. हा फोटो शेअर करत अत्यंत खास असे कॅप्शन देखील प्रियांका चोप्रा हिने दिले आहे. लोक आता मनारा हिला सपोर्ट करताना दिसत आहेत.
प्रियांका चोप्रा हिने फोटो शेअर करत लिहिले की, छोट्या मनारा चोप्राला थ्रोबॅक, लक लिटिल वन…आता प्रियांका चोप्रा हिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसतंय. मनारा चोप्रा ही या आठवड्यामध्ये नाॅमिनेशनमध्ये आहे. मात्र, प्रेक्षकांना मनारा चोप्रा ही आवडताना दिसत आहे. मुनव्वर फारुखी आणि मनारा चोप्रा यांच्यामध्ये बिग बाॅसच्या घरात एक मैत्री देखील बघायला मिळतंय.