AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस घटस्फोटाच्या तयारीत?

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल अर्थातच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस या जोडीचे भारतातच नाही, तर जगभरात लाखो चाहते आहेत. पण या दोघांच्या चाहत्यांसाठी चिंतेत टाकणारी बातमी आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस घटस्फोटाच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्याबाबत अधिकृत दुजोरा नाही.  अमेरिकेतील एका प्रसिद्ध वेबसाईटने याबाबतचे […]

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस घटस्फोटाच्या तयारीत?
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल अर्थातच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस या जोडीचे भारतातच नाही, तर जगभरात लाखो चाहते आहेत. पण या दोघांच्या चाहत्यांसाठी चिंतेत टाकणारी बातमी आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस घटस्फोटाच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्याबाबत अधिकृत दुजोरा नाही.  अमेरिकेतील एका प्रसिद्ध वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून प्रियांका आणि निक यांच्यात वाद सुरु आहे. त्यांच्यात सतत छोट्या-छोट्या गोष्टींमुळे भांडण होतात. प्रियांकाला लग्नाआधी निक खूप कुल वाटायचा, मात्र आता तो तिला सतत कंट्रोल करणारा वाटू लागला आहे. तर निकच्या मते, प्रियांका खूप लवकर चिडते, तिला खूप राग येतो. विशेष म्हणजे या दोघांनी खूप घाईघाईत लग्न केले आहे. त्या दोघांच्या स्वभावात विभिन्नता आहे. प्रियांका ही खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे. त्यामुळे निकनं प्रियांकाशी घटस्फोट घ्यावा असं जोनस कुटुंबियांना वाटतं. पण याबाबत अधिकृतरित्या कोणतेही वृत्त समोर आलेले नाही. तसेच यावर निक किंवा प्रियांकाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अवघ्या काही दिवसांपूर्वी प्रियांका आणि निक फ्लोरिडाजवळील मियामी या ठिकाणी सुट्टी गेले होते. त्याबाबतचे फोटो आणि व्हीडिओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या फोटोवरून तरी या दोघांमध्ये चांगलेच बॉण्डींग निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे.

View this post on Instagram

To live for days like this. ❤️ @nickjonas #boatlife

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

View this post on Instagram

When Bollywood music kicks in.. #tareefan #kareenakapoor @sonamkapoor @badboyshah ❤️ @nickjonas @joejonas @sophiet

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

View this post on Instagram

When the crew looks this good ???❤️

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

जून 2018 पासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रियांका आणि निकने डिसेंबरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. सहा महिने रिलेशनमध्ये राहिल्यानंतर 1 आणि 2 डिसेंबर 2018 रोजी राजस्थानमधील जोधपूरजवळी उम्मैद भवन पॅलेसमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला. त्यांच्या लग्नानंतर 4 वेडींग रिसेप्शनचेही आयोजन केले होते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?