AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Chopra | प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर शेअर केले बोल्ड फोटो, पत्नीचा ग्लॅमरस अवतार पाहून निकही घायाळ!

अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात पसरले आहेत.

Priyanka Chopra | प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर शेअर केले बोल्ड फोटो, पत्नीचा ग्लॅमरस अवतार पाहून निकही घायाळ!
प्रियंका आणि निक
| Updated on: May 24, 2021 | 12:44 PM
Share

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात पसरले आहेत. माजी मिस वर्ल्ड असलेल्या प्रियांकाने तिच्या अभिनयाने सर्वांच्या मनात घर केले आहे. प्रियांकानेही तिच्या कारकीर्दीत बर्‍याच वेळा आव्हानात्मक भूमिका स्वीकारल्या आहेत आणि त्या लीलया पार पडून आपल्या चाहत्यांना वेड लावलं आहे. आता प्रियंका तिच्या चाहत्यांना तिच्या बोल्ड स्टाईलने वेड लावते. नुकतीच पुन्हा एकदा देसी गर्लची एक नवी स्टाईल पाहायला मिळत आहे (Priyanka Chopra Share bold photos on social media).

अलीकडेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिचा पती गायक निक जोनास याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका कार्यक्रमाच्या सेटवर निकला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर आता देसी गर्लने तिच्या पतीचा पहिला फोटो शेअर केला आहे.

अतिशय बोल्ड लूकमध्ये दिसली प्रियंका चोप्रा

प्रियंकाने पुन्हा एकदा तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत आपल्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांना वेड लावले आहे. वास्तविक, प्रियंकाने केलेलं हे फोटो बिलबोर्ड संगीत पुरस्कारांमध्ये काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत. हा सोहळा आज प्रदर्शित होणार आहे, जो निक जोनस होस्ट करणार आहे.

पाहा फोटो

प्रियांकाने तिच्या बोल्ड स्टाईलमधले अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जिथे ती दोन फोटोंमध्ये एकटीच दिसली आहे, तर एका फोटोमध्ये ती पती निक बरोबर दिसली आहे. या फोटोमध्ये निक प्रियंकाच्या डोळ्यात हरवलेला दिसला आहे (Priyanka Chopra Share bold photos on social media).

फोटोंमध्ये प्रियंका चोप्राने स्किन कलरच्या ड्रेस परिधान करून बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने आपले केस मोकळे सोडले आहेत. यावेळी अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक आत्मविश्वास दिसून येत आहे. एका फोटोमध्ये ती निकसोबत दिसली असून, यामध्ये निक ग्रीन कलरच्या कोट पॅन्टमध्ये दिसला आहे. या फोटोमध्ये तो पत्नीच्या डोळ्यांत हरवलेला दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहेत.

निकला साथ देणार प्रियंका

नुकतेच दुखापत झाल्यानंतरही निक जोनास आता बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स 2021 हा सोहळा होस्ट करणार आहे. हा शो 24 मे रोजी आयोजित करण्यात येणार आहे. बीबीएमए 2021 हा पहिला असा अवॉर्ड शो असेल, जो कोरोनाची लस अमेरिकेत उपलब्ध झाल्यानंतर या काळात थेट प्रक्षेपीत केले जाईल. या वृत्तानुसार, प्रियंका चोप्रा बीबीएमए 2021चा एक महत्त्वाचा भाग असणार आहे.

(Priyanka Chopra Share bold photos on social media)

हेही वाचा :

Indian Idol 12 : सवाई भट्ट जापानी मुलीच्या प्रेमात!, दानिशनं केला मोठा खुलासा

हिरोईनला उचलून स्क्वॅट, ट्रोलर म्हणतो, संस्कृती आणि इज्जत दाखवू नका, अभिनेत्याचं भन्नाट उत्तर

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.