सिग्नलवर कार थांबली अन् ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने केली गरजू व्यक्तीची मदत; चाहत्यांची जिंकली मने

प्रियांका चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तिची कार एका सिग्नलवर थांबली असता तिने तिथे उभ्या असलेल्या एका गरजू व्यक्तीला मदत केली. तिच्या या कृतीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. नक्की प्रियांकाने केलं काय?

सिग्नलवर कार थांबली अन् देसी गर्ल प्रियांका चोप्राने केली गरजू व्यक्तीची मदत; चाहत्यांची जिंकली मने
| Updated on: Feb 21, 2025 | 2:59 PM

बॉलीवूडची ‘देसी गर्ल’अन् ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. भावाच्या लग्नामुळे प्रियांका भारतात आली होती. लग्नावेळीचेतिचे सर्व लूक, फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअरही करण्यात आले. प्रत्येक लूकमध्ये प्रियांकाचं सौंदर्य पाहायला मिळाल. प्रियांका भाऊ सिद्धार्थ चोप्राचं लग्न करून कामानिमित्ताने हैदराबादला गेली होती.

प्रियांका चोप्राच्या कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली

मात्र त्या आधी प्रियांका प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली आणि महेश बाबू यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हैदराबादला गेली होती. त्यानंतर प्रियांका मंगळवारी मुंबईत परतली. ती नुकतीच कलिना एअरपोर्टवर स्पॉट झाली. याच प्रवासातील प्रियांकाच्या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमधील तिच्या कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

सिग्नलवर थांबलेल्या गरजू व्यक्तीला केली मदत

या व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्राने राखाडी रंगाचा स्वेटपँट, राखाडी रंगाचा टॉप आणि कॅप घातलेली दिसत आहे. कॅज्युअल लूकमध्ये ती देसी गर्ल दिसत होती.

या व्हिडिओमध्ये प्रियांका कारमधून प्रवास करत असताना तिची कार एका सिग्नलवर थांबते तेव्हा तिच्या कार जवळ असलेल्या एक गरजू व्यक्ती तिच्या कारच्या जवळ उभा असलेला दिसत आहे. यावेळी प्रियांकाने त्या व्यक्तीला काही पैसे दिल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांकाचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये.

चाहत्यांच्या भरभरून कमेंटस्

प्रियांकाचा हा व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं, ‘हा व्हिडिओ मन जिंकणारा आहे.’ दुसऱ्या एकानं लिहिलं आहे, ‘प्रियांका ही एक चांगली व्यक्ती आहे.’ ,तसेच या व्हिडिओवर अनेकजण हार्ट इमोजी शेअर करू ‘देसी गर्ल’वर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

राजामौली यांच्या चित्रपटात प्रियांकाची खलनायिकेची भूमिका

तिचा हा व्हिडिओ अनेकजण पसंत करत आहेत. सध्या प्रियांका ही भारतात तिच्या आगमी चित्रपटावर काम करत आहे. प्रियांका हैदराबादमध्ये तिच्या चित्रपटाच्या शूटिंग करत आहे. ती अनेकदा हैदराबाद ते मुंबई प्रवास करत असते.

प्रियांका चोप्रा ऊथ चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘एसएसएमबी29’ या चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर साऊथ स्टार महेश बाबू दिसणार आहे. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रियांका या चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारत आहे. तसेच बऱ्याच दिवसानंतर प्रियांकाचा या चित्रपटामध्ये एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाद्वारे प्रियांका भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत असल्यानं तिचे चाहते देखील खूश आहेत.