AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेस्बियन कपल अन् आई होण्याचं स्वप्न..; ओटीटीवर येताच हा सायकोलॉजिकल थ्रिलर चर्चेत

ओटीटी प्लॅटफॉर्मवर जर तुम्हाला एखादा दमदार चित्रपट पहायचा असेल तर 'हा' चांगला पर्याय आहे. यामध्ये कोंकना सेन शर्मा आणि प्रतिभा रांटा यांच्या मुख्य भूमिका आहे. नेटफ्लिक्सवर हा सायकोलॉजिकल ड्रामा ट्रेंडमध्ये आहे.

लेस्बियन कपल अन् आई होण्याचं स्वप्न..; ओटीटीवर येताच हा सायकोलॉजिकल थ्रिलर चर्चेत
अक्युज्डImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 02, 2026 | 1:59 PM
Share

देशभरात होळी, रंगपंचमीचा उत्साह पहायला मिळतोय. अशातच सुट्ट्यांदरम्यान ओटीटीवर एखादा चांगला कंटेंट पहायची इच्छा होत असेल तर ‘नेटफ्लिक्स’वरील हा चित्रपट चांगला पर्याय आहे. या सायकोलॉजिकल थ्रिलरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येताच तो पहिल्या क्रमाकांवर ट्रेंड होऊ लागला आहे. या चित्रपटाने रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ आणि ‘तेरे इश्क में’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. या चित्रपटात असं काय खास आहे आणि सर्वत्र त्याची इतकी चर्चा का होतेय, त्याबद्दल जाणून घेऊयात..

या चित्रपटाचं नाव ‘अक्युज्ड’ (Accused) असं आहे. ‘डॉक्टर जी’ फेम दिग्दर्शक अनुभूती कश्यपने पुन्हा एकदा सर्वांत हटके कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. ‘अक्युज्ड’मध्ये दोन महिलांची कथा दाखवण्यात आली आहे. यामध्ये गीतिकाची भूमिका अभिनेत्री कोंकना सेन शर्माने साकारली असून मीराच्या भूमिकेत ‘लापता लेडीज’ फेम अभिनेत्री प्रतिभा रांटा आहे. हे दोघं विवाहित लेस्बियन कपल आहेत. गीतिका ही यशस्वी डॉक्टर असून करिअरमध्ये ती खूप पुढे जात आहे आणि तिला लवकरच एक मोठी जबाबदारी मिळणार असते.

पहा ट्रेलर-

गीतिका आणि मीरा हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खुश असतात आणि एकेदिवशी ते एका बाळाला दत्तक घेण्याचा विचार करतात. ज्यादिवशी ते ही बातमी जवळच्या लोकांमध्ये जाहीर करतात, त्याच्या दुसऱ्याच दिवशी गीतिकाच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट येतो. या कथेत मोठं वळण तेव्हा येतं, जेव्हा एक अनोळखी व्यक्ती गीतिकावर लैंगिक छळाचा आरोप करतो. बघता बघता ही बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरते. यामुळे रुग्णालयातील स्टार डॉक्टर गीतिकाला सक्तीच्या रजेवर पाठवलं जातं. त्यानंतर तिच्या नोकरीवरही गदा येते.

कायदा आणि सामाजिक गुंतागुंतीत अडकलेल्या मीराचं आई होण्याचं स्वप्न हळूहळू फक्त स्वप्नच बनून राहतं. या चित्रपटाची सर्वांत जमेची बाजू म्हणजे त्यातील कलाकार. कोंकना सेन शर्माने अत्यंत प्रभावीपणे तिची भूमिका साकारली आहे. तर प्रतिभानेही तिच्या दमदार अभिनयकौशल्याने कथेला आणखी मजबूती दिली. नाती आणि समाज यांच्यातील विचारांमधील फरक अत्यंत प्रभावीपणे यात मांडण्यात आलं आहे. या चित्रपटाचा क्लायमॅक्ससुद्धा विचारात पाडणार आहे.

Follow Us
विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
Vidhan Parishad Election | विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
Nashik Vidhan Parishad | गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी!
Gokul Gite | महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी! गोकुळ गीतेंचं मोठं विधान
काही काळातच मोठं घडलं; ते एक विधान आणि.... आष्टिकरांच्या लेकाची पक्षात
काही काळातच मोठं घडलं; ठाकरे गटातील बंडखोर नेत्याला मोठा धक्का; पक्षाने थेट लेकाला...
ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; आष्टीकरांचा अंधारेंवर हल्लाबोल
Krushna Ashtikar | ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; कृष्णा आष्टीकरांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला...
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी...
शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला गौप्यस्फोट
Sanjay Raut UNCUT | मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचं हसू खोटं? शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट
ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत माहिती
Big Breaking | ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत सर्वात मोठी अपडेट; राजकारणातील घडमोडींना वेग
विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?
Vidhan Parishad Election Result | विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?