
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची जोडी जेवढी प्रसिद्ध असते त्याहीपेक्षा जास्त आता त्यांची लेक राहा जास्त चर्चेत आहे. तिच्या एका झलकसाठी पापाराझीही आतुर असतात. सुरुवातीला पापाराझींना पाहून घाबरणारी राहा आता त्यांच्या चांगलीच ओळखीची झालेली पाहायला मिळते. पापाराझी दिसले की राहा न घाबरता किंवा लाजता थेट त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते.
राहा आणि पापाराझींची चांगलीच मैत्री झाल्याचे दिसून येते. पापाराझींना पासून राहा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. राहा सध्या पापाराझींची आवडती स्टारकिड ठरत आहे.राहा कपूर राहाचे काही लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायंत, ज्यामध्ये तिच्या कृतीमुळे ती सगळ्याची आवडती झाली. रणबीर-आलियाचे चाहते तर तिचे हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत.
राहाच्या एका कृतीने पापाराझींचे जिंकले तर आलीयालाही कौतुक वाटले
असाच एक राहाचा एअरपोर्टवरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अवघ्या दुसऱ्या वर्षाची राहा कपूर विमानतळावर एखाद्या फिल्मस्टारसारखी वागताना दिसली. शुक्रवारी रात्री रणबीर आणि आलिया यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ते राहासोबत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जाताना एअरपोर्टवर दिसून आले. या व्हिडिओमध्ये राहा आलियाच्या कुशीत होती.
हात उंचावून पापाराझींचा निरोप घेतला
राहा जेव्हा पापाराझींना पाहते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असून ती लगेच हात उंचावून त्यांना बाय करते आणि जेव्हा पापाराझींनीही तिला ओरडून ‘बाय राहा’ असे म्हटले, तेव्हा तिने मागे वळून पापाराझींना फ्लाइंग किस देताना दिली. राहाची कृती पाहून पाहाराझीही खूश झालेले पाहायला मिळाले. एवढेच नाही तर राहाने केलेलं कृत्य पाहून आलियाला हसू आवरत नव्हते. रणबीरही राहाकडे पाहत हसताना दिसत आहे.
पापाराझी झालेत राहाचे फेव्हरेट