
प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी संसाराला 17 वर्ष पुर्ण झाल्यानंतर पत्नी नेहा हिच्यापासून विभक्त होण्याच्या निर्णय घेतला. घटस्फोट घेऊन काही महिने झाल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले. त्यापूर्वी नेहा आण राहुल यांच्या घटस्फोटाबद्दल कोणालाही साधी कुणकुणही नव्हती. सोशल मीडियावर राहुल देशपांडेंनी एक पोस्ट शेअर करत आम्ही दोघे सहमतीने विभक्त झाल्याचे म्हटले. राहुल देशपांडेच्या घटस्फोटानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. हेच नाही तर ज्यावेळी राहुल देशपांडेंनी घटस्फोटाबद्दल जाहीर केले, त्यावेळीच त्यांनी स्पष्ट म्हटले की, मी पत्नीसोबत घटस्फोट घेतला असला तरीही ती कायमच माझी मैत्रिण राहिल. त्यावेळी राहुल देशपांडेंची एक्स पत्नी नेहा यांनी काहीच भाष्य केले नव्हते.
आता राहुल देशपांडेसोबतच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच नेहा व्यक्त झाल्या. इंस्टास्टोरीला एक फोटो शेअर करत नेहा यांनी राहुल देशपांडे यांच्यासोबतचा खास फोटो शेअर केला. या फोटोमध्ये राहुल आणि नेहा यांची मुलगी देखील दिसत आहे. हा फोटो शेअर करत नेहा यांनी राहुल देशपांडेंना म्हटले की, तू माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट व्यक्ती आहेस. तुझा प्रत्येक दिवस आनंदी जावो… राहुलसाठी ही पोस्ट शेअर करण्याचे खास कारणही आहे.
राहुल देशपांडेच्या वाढदिवसानिमित्त ही पोस्ट नेहा यांनी शेअर केली. यासोबतच वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील एक्स पतीला नेहा यांनी दिल्या. नेहा यांची ही पोस्ट चांगली व्हायरल होताना दिसत आहे. घटस्फोटानंतर राहुल देशपांडे यांनी ज्याप्रकारे सांगितले होते की, पत्नी नेहा कायमच माझी मैत्रिणी राहणार आहे, त्याचप्रकारे नेहा या देखील आपले मित्राचे नाते जपत असल्याचे या पोस्टवरून स्पष्ट होत आहे.
राहुल देशपांडे आणि नेहा यांच्या घटस्फोटाबद्दल कळाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मात्र, दोघांनीही घटस्फोटाचे कारण सांगितले नाही. राहुल देशपांडे कायमच आपल्या मुलीसोबतचे खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत. काही दिवसांपूर्वीच राहुलने मुलीसोबतचा एक गोड व्हिडीओ शेअर केला. जो चाहत्यांना प्रचंड आवडताना देखील दिसला.