छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर

छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये पडलेला होता अभिनेत्रीचा मृतदेह... तब्बल 24 तास पोत्यातच... ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर आलं आणि सर्वांच्या अंगावर काटाच उभा राहिला, कोणी संपवलं अभिनेत्रीला...

छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच... ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
Raima Islam Shimu
| Updated on: Aug 24, 2026 | 12:07 PM

जवळपास साडे चार वर्षांपूर्वी एक प्रसिद्ध आणि लोकप्रिया अभिनेत्री सिनेमाच्या शुटिंगसाठी घरातून बाहेर तर निघाली. पण, सेटवर पोहोचलीच नाही. एक तास उलटला, दोन तास झाले, तीन तास झाले, चार…, पाच… पण अभिनेत्री भेटलीच नाही. 24 तासांनंतर देखील अभिनेत्री भेटली नाही. अखेर कुटुंबियांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अभिनेत्री बेपत्ता असल्याचा पोलिसांना संशय आला. पण तपास पुढे सरकल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं. अभिनेत्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत 24 तास झुडपांमध्येच पडलेला होता.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती दुसरी तिसरी कोणी नाही तर, बांगलादेशी अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू (Raima Islam Shimu) आहे. नेमकं काय झालं आहे, हे कळण्यासाठी काहीच मार्ग नव्हता. अभिनेत्री पोत्यात दोन तुकडे झाले होते. पोलिसांनी घरातूनच तपास सुरु केलेला. रायमा हिचा नवला प्रसिद्ध व्यावसायिक शखावत अली नोबेलपासून बहिणीपर्यंत आणि घरकाम करणाऱ्यांपर्यंत पोलिसांनी चौकशी केली. सर्वांचं एकच उत्तर होतं आणि ते म्हणजे अभिनेत्री सकाळी सात वाजताच शुटिंगसाठी गेली आहे.

त्यानंतर इंडस्ट्रीतील लोकांची चौकशी देखील केलं. तेव्हा पोलिसांनी अभिनेता जायद खान याच्यावर देखील संशय घेतला. कारण काही वर्षांपूर्वी त्यांचं भांडण झालं होतं. दोघेही फिल्म आर्टिस्ट असोसिएशनच्या सदस्यत्वावरून भिडले होते. जायद खान याची चौकशी केल्यानंतर समोर आलं की, जायद आणि रायमा यांचा गेल्या दोन वर्षांपासून संपर्कच झाला नव्हता. त्यामुळे पोलिसांचा संशय फेल ठरला.

त्यानंतर पोलिसांनी पुन्हा घरातूनच तपास करण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांची नजर रायमा हिच्या गाडीवर गेली. रायमा आणि पती शखावत एकच गाडी वापरत होते. पोलिसांनी गाडीची चौकशी केली. गाडीचा दरवाजा उघडता ब्लीचिंग पावडरचा वास आसा आणि संपर्ण रहस्य समोर आलं. रायमा हिचा मृतदेह लपवण्यासाठी तिच्याच गाडीचा वापर केल्याची माहिती समोर आहे,

पोलिसांनी कसून तपास सुरु केल्यानंतर कळलं की, पुरावे नष्ट करण्यासाठी ब्लीचिंग पावडरचा उपयोग करण्यात आलेला. गाडीत दोरीचा एक बंडल देखील होता. ज्याने मृतदेहाची पोती बंधली होती. तेव्हा कळलं की, अभिनेत्रीची हत्या तिच्या नवऱ्यानेच केली. त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीचा पती शखावत याला अटक केली. त्यानंतर अखेर शखावत याने गुन्हा कबूल केलाच. यामध्ये त्याने अब्दुल्लाची मदत घेतली होती.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे दोघांच्या संसारात अनेक अडचणी येऊ लागलेल्या. त्याचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला. संपूर्ण घराची जबाबदारी रायमा हिच्यावर आलेली. 16 जानेवारी 2022 रोजी दोघांमधील वाद टोकाला पोहोचला. त्यानेतर त्याने रागाच्या भरात अभिनेत्रीला मारहाण केली आणि तिचा गळा दाबला… त्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी मित्राची मदत घेतली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us