सिगारेट ओढते, दारू पिते…, शिल्पा शेट्टीबद्दल कशी होती सासऱ्यांची पहिली प्रतिक्रिया?

Shilpa Shetty Kundra: सिगारेट ओढते, दारू पिते... अशी सून..., शिल्पा शिट्टी हिच्याबद्दल सुरुवातीला कसा विचार करत होते सासरे, कशी होती पहिली प्रतिक्रिया..., शिल्पा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

सिगारेट ओढते, दारू पिते..., शिल्पा शेट्टीबद्दल कशी होती सासऱ्यांची पहिली प्रतिक्रिया?
फाईल फोटो
| Updated on: Sep 06, 2025 | 8:52 AM

Shilpa Shetty Kundra: अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. फक्त प्रोफेशनल आयुष्याच नाही खासगी आयुष्यात देखील शिल्पा आनंदी आहे. नुकताच झालेल्या व्लॉगमध्ये शिल्पाचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याने मोठा खुलासा केली आहे. राज कुंद्रा पहिल्या नजरेतच शिल्पाच्या प्रेमात पडला… मुलागा एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करतोय म्हणून, राज याचे वडील देखील आनंदी होते. पण त्यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर शिल्पा देखील हसू आलं…

राज कुंद्रा म्हणाला, ‘मझ्या वडिलांना असं वाटलं की, अभिनेत्रीला डेट करतोय? अभिनेत्री दारू पितात, सिगारेट ओढतात…’ पण राज कायम म्हणायचा, जोपर्यंत आपण त्या व्यक्तीला भेटत नाही, पाहात नाही… तोपर्यंत त्यांच्याबद्दल काही बोलणं देखील योग्य नाही…

अखेर शिल्पा हिला पहिल्यांदा भेटल्यानंतर राज कुंद्रा याच्या वडिलांचे सर्व तक्रारारी दूर झाल्या… राज पुढे विनोदी अंदाजात म्हणाला, ‘शिल्पाला भेटल्यानंतर, ते मला म्हणाले तू आता बाजूला होता… आम्हाला काही बोलायचं आहे…’

यावर शिल्पाने देखील मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘माझे सासू – सासरे माझ्यावर राज पेक्षा देखील अधिक प्रेम करतात… ‘ सांगायचं झालं तर, फराह खान हिच्या व्लॉगमध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा एकत्र दिसले. यावेळी दोघांनी खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल खूप काही सांगितलं.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचं खासगी आयुष्य

2007 मध्ये राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची पहिली ओळख झाली. एका इव्हेंटमध्ये दोघे पहिल्यांदा भेटले आणि त्यानंतर भेटी वाढतच गेल्या. अखेर या भेटींचं रुपांतर प्रेमात झालं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर राज आणि शिल्पा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

2009 मध्ये शिल्पा आणि राज यांनी मोठ्या उत्साहात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्नानंतर 2012 मध्ये शिल्पा हिने मुलगा विवान याला जन्म दिला. त्यानंतर लेक समिशा हिचं सरोगेसीच्या मदतीने जगात स्वागत केलं. अभिनेत्री कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सांगायचं झालं तर, राज याचं शिल्पा याच्यासोबत दुसरं लग्न केलं आहे. शिल्पा राज याची दुसरी पत्नी आहे. शिल्पा हिला एक सावत्र मुलगी देखील आहे..

शिल्पा आता  बॉलिवूडमध्ये पूर्वी प्रमाणे सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.