Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ सिनेमाचीच सर्वत्र गर्जना, मराठीत रचला मोठा इतिहास
Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमा 1 मे रोजी प्रदर्शित झालेले. बॉक्स ऑफिसवर सिनेमा अद्यापही तगडी कमाई करत आहे. तर सिनेमाने मराठीत मोठा इतिहास रचला आहे.

Raja Shivaji : सध्या सांगायचं झालं तर, बॉक्स ऑफिसवर ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा बोलबाला दिसत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात सिनेमाने मोठी कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात देखील बॉक्स ऑफिसवरील सिनेमाची पकड मजबूत आहे… रितेश देशमुख दिग्दर्शित आणि स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसकत आहे. 10 व्या दिवशी देखील सिनेमाने मोठी मजल मारली असून मराठी सिनेविश्वात मोठा इतिहास रचला आहे.
‘राजा शिवाजी’ सिनेमाचं 10 व्या दिवसाचं कलेक्शन
‘राजा शिवाजी’ने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवलं आहे. सिनेमाचा ओपनिंग वीकेंड दमदार होता, पण आठवड्याच्या दिवसांमध्ये त्याच्या कमाईत चढ-उतार दिसून आला. मात्र, दुसऱ्या वीकेंडपासून सिनेमाला लक्षणीय फायदा झाला आणि नवीन सिनेमांची स्पर्धा असूनही, ‘राजा शिवाजी’च्या दुसऱ्या शनिवारपासून दुसऱ्या रविवारपर्यंतच्या कमाईत मोठी वाढ झाली. हा सिनेमा आता भारतीय बॉक्स ऑफिसवर 70 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचला आहे, ज्यामुळे तो आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा बनण्याच्या तयारीत आहे.
सिनेमाच्या कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्या आठवड्यात सिनेमाने 52.65 कोटींचा गल्ला जमा केला. त्यानंतर आठव्या दिवशी सिनेमाने 3.20 कोटी रुपये कमावले. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ने प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी, म्हणजेच दुसऱ्या रविवारी, 6.80 कोटींची कमाई केली आहे. यामुळे, ‘राजा शिवाजी’ची भारतातील 10 दिवसांची निव्वळ कमाई आता 68.25 कोटी झाली आहे.
‘राजा शिवाजी’ सिनेमाने 2 मराठी सिनेमांना मागे टाकलं आहे. तर जाणून घ्या मराठीत सर्वात जास्त कमाई करणारे सिनेमे… मराठीमध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या 10 सिनेमांची यादी –
सैराट – 80.98 कोटी
बाईपण भारी देवा: 76.92 कोटी
राजा शिवाजी: 68.25 (दहा दिवसांची कमाई)
वेड: 61.20 कोटी
नटसम्राट: 42 कोटी
कट्यार कळजात घुसली: 40 कोटी
पवनखिंड: 37.72 कोटी
लाई भारी: 37 कोटी
टाइमपास: 33 कोटी
क्रांतिज्योती विद्यालय मराठी मध्यम: 28 कोटी
‘राजा शिवाजी’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारित आहे. सिनेमात रितेश याने महाराजांची भूमिका साकरली आहे. तर संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, जिनिलिया देशमुख, फरदीन खान, भाग्यश्री, सचिन खेडेकर, अमोल गुप्ते, बोमन ईराणी आणि जितेंद्र जोशी यांसारख्या सेलिब्रिटींनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता सलमान खान याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.