Raja Shivaji : अभिनय करताना हरपून गेलेला संजय दत्त, पकडलेला अभिनेत्रीचा गळा, त्यानंतर तर…
Raja Shivaji : 'राजा शिवाजी' सिनेमातील एका सीन दरम्यान पूर्णपणे हरपून गेलेला संजय दत्त, झटक्यात पकडलेला अभिनेत्रीचा गळा, त्यानंतर तर..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राजा शिवाजी सिनेमाची चर्चा...

अभिनेता रितेश देशमुख स्टारर आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा मराठी सिनेविश्वातील सर्वात मोठा सिनेमा म्हणून उदयास येतं आहे. त्यामागील एकमेव महत्त्वाचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज… प्रेक्षकांसाठी ‘राजा शिवाजी’ सिनेमा फक्त एक सिनेमा नाही तर, भावना आहे… सिनेमात अनेक कलाकार आहेत, ज्यांनी सिनेमा दमदार व्हावा म्हणून प्रचंड मेहनत घेतली आहे आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. आज सिनेमा प्रदर्शित होऊन 11 दिवस झाले आहे. पण तरी देखील सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील पकड मजबूत आहे. सिनेमा किती कमाई करत आहे, याचे आकडे तर समोर येतच आहेत. पण सिनेमाच्या शुटींग दरम्यान झालेल्या किस्से देखील समोर येत आहेत.
‘राजा शिवाजी’ सिनेमात अभिनेता संजय दत्त महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अभिनेत्याने खलनायक अफजल खान याची भूमिका साकारली आहे. सांगायचं झालं तर, अनेक सिनेमांमध्ये अफजल खान याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. रितेशच्या सिनेमात देखील अभिनेत्याने खलनायकाच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे… तर अफजल खान याच्या बायकोची भूमिका मराठी अभिनेत्री दिशा परदेशी हिने साकारली आहे… सिनेमात दिशा हिचा एक सीन आहे, ज्यामध्ये ती पाण्यात डुबते आणि त्यानंतर तिची हत्या केली जाते. हा सीन करण्यासाठी अभिनेत्रीला मोठी मेहनत घ्यावी लागली…
दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दिशा हिने सिनेमाच्या शुटिंगचा एक किस्सा सांगितला, जेव्हा संजूबाबाने अभिनेत्रीचा गळा पकडला होता. दिशा म्हणते, ‘संजय दत्त याच्यासोबत काम करणं माझ्यासाठी एका चांगला अनुभव होता… संजय सेटवर कायम शांत आणि फोकस असतो… तो सेटवर येतो, त्याचा सीन शुट करतो आणि जाऊन एका जागी बसतो… जेव्हा माझ्या परफॉरमेंसमध्ये काही करेक्शन असतील, तर तो मला कायम म्हणायचा, ‘बेटा असं नाही, हा सीन अशा प्रकारे कर…’ सर्वात आधी तर तो संजय दत्त आहे आणि अफजल खानाचा रोल प्ले करतोय… पहिल्यांदा त्या भूमिकेत त्याला पाहिल्यानंतर मी पूर्णपणे घाबरली होती.’
पुढे दिशा म्हणाला, ‘सिनेमात आमचा एक सीन आहे, ज्यामध्ये अफजल खान माझ्या गालांना स्पर्श करतो आणि त्यानंतर झटक्यात माझा गळा पकडतो आणि त्याने खरंच माझा गळा पकडला होता… पण जेव्हा सीन पूर्ण झाला, संजय माझ्याकडे आला आणि मला सॉरी म्हणाला. तो एका जेंटलमेन आणि विनम्र व्यक्ती आहे…’ असं देखील दिशा म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘राजा शिवाजी’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.