Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा थिएटरमधील टाइम ओव्हर; रितेश देशमुखचा सिनेमा हिट की फ्लॉप?

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमाचा चित्रपटगृहातील प्रवास आता संपला आहे. आता सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. पण 100 कोटींचा हल्ला पार करुनही 'राजा शिवाजी' सिनेमा हिट की फ्लॉप? अशा चर्चा रंगल्या आहेत..

Raja Shivaji : राजा शिवाजी सिनेमाचा थिएटरमधील टाइम ओव्हर; रितेश देशमुखचा सिनेमा हिट की फ्लॉप?
| Updated on: Jun 19, 2026 | 11:13 AM

Raja Shivaji Film Final Box Office Collection : अभिनेता रितेश देशमुख याने स्वतःच्या भूमिका निवडीमध्ये मोठे बदल केले आहे. करियरच्या सुरुवातीला रितेश कायम सहाय्यक भूमिकेत दिसायचा. पण आता झालेल्या बदलामुळे अभिनेता एकापेक्षा एक सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आला आणि चाहत्यांच्या मनावर त्याने राज्य केलं. ज्याचा रितेश याला मोठा फायदा देखील झाला. ‘राजा शिवाजी’ सिनेमात अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला. चाहत्यांनी देखील सिनेमाला डोक्यावर घेतलं. आता ‘राजा शिवाजी’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, जगभरात सिनेमाने 130 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ज्यामुळे मराठी सिनेविश्वात सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ‘राजा शिवाजी’ ठरला… तर जाणून घ्या ‘राजा शिवाजी’ सिनेमा हिट ठरला की फ्लॉप?

‘राजा शिवाजी’ सिनेमाचं दिग्दर्शन रितेश देशमुख याने कंल आहे. मुख्य अभिनेता म्हणून देखील त्यानेच भूमिका साकारली. सिनेमात दमदार भूमिका साकारत त्याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सिनेमाच्या बजेटबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, सिनेमाने 100 कोटींमध्ये तयार झाला आहे… तर सिनेमाची कमाई 130 कोटी आहे… सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी केली… पण सिनेमात हिट ठरला की फ्लॉप झाला? अशा चर्चा रंगल्या आहेत.

‘राजा शिवाजी’ सिनेमानंतर मराठी सिनेमाचे चांगले दिवस आले.. असं म्हणायला हरकत नाही. कारण रितेश देशमुख याने ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं दमदार प्रमोशन केलं आणि 130 कोटींची कमाई केली. पण कोणताच गाजावाजा न करता प्रवीण तरडे यांचा ‘देऊळ बंद 2’ सिनेमा प्रदर्शित झाला. फक्त 10 – 12 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘देऊळ बंद 2’ सिनेमाने काही दिवसांत 90 कोटी रुपयांची कमाई केली.

90 कोटी रुपयांची कमाई करत ‘देऊळ बंद 2’ सिनेमा मराठी सिनेविश्वात सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा सिनेमा ठरला आहे. ‘देऊळ बंद 2’ च्या पहिल्या भागाने देखील चांगली कमाई केलेली. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की, येत्या काही दिवसांत ‘देऊळ बंद 2’ किती कोटी रुपयांचा टप्पा गाढतो.

राजा शिवाजी सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

मिळालेल्या माहितीनुसार, ‘राजा शिवाजी’ सिनेमा हॉटस्टारवर स्ट्रीम करण्यात येणार आहे… पण सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप कळू शकलेली नाही. पण असं सांगण्यात येत आहे की, सिनेमा जुलैमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Follow Us