अन्नाथेच्या सेटवरील 8 जणांना कोरोना, आता स्वत: रजनीकांत रुग्णालयात दाखल

| Updated on: Dec 25, 2020 | 2:00 PM

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत(Rajinikanth) हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

अन्नाथेच्या सेटवरील 8 जणांना कोरोना, आता स्वत: रजनीकांत रुग्णालयात दाखल
Follow us on

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत(Rajinikanth) हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. रजनीकांत यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने आज सकाळी ते हैदराबादमध्ये रुग्णालयात दाखल झालेत. रजनीकांत बरे व्हावेत म्हणून चाहत्यांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. उच्च रक्तादाबाशिवाय रजनीकांत यांना इतर त्रास नसल्याची माहिती अपोलो रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. (Superstar Rajinikanth admitted to Apollo hospital in Hyderabad after bp fluctuations )

रजनीकांत कोरोना निगेटीव्ह

सुपरस्टार रजनीकांत गेल्या 10 दिवसांपासून हैदराबादमध्ये चित्रीकरण करत होते. 22 डिसेंबरला त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती ती निगेटिव्ह आली असल्याची माहिती अपोलो रुग्णालयानं दिली आहे.

अपोलो हॉस्पिटलचे प्रसिद्धीपत्रक

रजनीकांत यांच्या प्रकृतीविषयी अपोलो रुग्णालयाचे प्रसिद्धीपत्रक

अन्नाथेच्या सेटवरील लोकांना कोरोना

कोरोना काळातील लॉकडाऊननंतर जवळपास सर्व चित्रपटांचे चित्रीकरण ठप्प झाले होते. आता देशात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असून, सर्व चित्रपटांचे चित्रीकरण पुन्हा एकदा सुरू केले जात आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) हे सध्या अन्नाथे (Annaatthe) या चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्या चित्रपटाच्या सेटवरील 8 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आता चित्रपटाचे शूटिंग बंद करण्यात आले आहे. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये 14 डिसेंबरपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले होते. ज्यानंतर सेटवर कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्यानंतर शूटिंग थांबविण्यात आले आहे.

या विषयावर बोलताना रजनीकांतचे प्रवक्ते रियाज अहमद यांनी इंडिया टुडेसोबत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रवक्त्याने इंडिया टुडेला दिलेल्या माहितीत सांगितले की, चित्रपटाच्या सेटवर उपस्थित लोकांपैकी 8 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले असल्याचे सांगतिले होते. याच कारणास्तव, रजनी सर हैदराबादमध्ये स्वत: ला क्वारंटाइन करतील किंवा चेन्नईला परत येईल,अशी माहिती रियाज अहमद यांनी दिली होती.

अन्नाथेचे शूट सुरू होण्यापूर्वी सन पिक्चर्स, प्रॉडक्शन हाऊसने रजनीकांतसाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली होती. रजनीकांत यांच्यासह त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतही त्यांच्यासोबत हैदराबादला आली होती. प्रोडक्शन हाऊसने ऐश्वर्या आणि वडील रजनीकांत यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

संबंधित बातम्या : 

Annaatthe | ‘अन्नाथे’ चित्रपटाच्या सेटवर आठजण कोरोना पॉझिटिव्ह, रजनीकांत क्वारंटाइन होणार!

Photo : मराठमोळं नाव ते साऊथचे सुपरस्टार ! रजनीकांतचा अफलातून प्रवास

(Superstar Rajinikanth admitted to Apollo hospital in Hyderabad after bp fluctuations )