
राखी सावंत आपल्या मोठमोठ्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत मुंबईत परतली आहे आणि ती परतल्यापासून पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. सर्वत्र तिच्याच चर्चा आहेत. आता राखी सावंतचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर युजर्सचं म्हणणं आहे की राखी बिग बॉस 19 च्या तान्या मित्तलच्या पावलांवर पाऊल ठेवत आहे. राखी नेहमीच तिच्या वक्तव्यांने सर्वांना चकीत करते. या व्हिडीओमध्ये राखी सावंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल बोलत आहे आणि ती जे काही बोलत आहे, ते ऐकून लोकांचं म्हणणं आहे की ही गोष्ट पचवण्यासाठी त्यांना हजमोलाची गोळी खावी लागेल.
राखी सावंत काय म्हणाली?
या व्हिडीओमध्ये राखी सावंत एक डायमंडच्या ड्रेसमध्ये दिसत आहे आणि ती म्हणते, “थँक यू पापा डोनाल्ड ट्रम्प. माझे डोनाल्ड पापा माझ्यासाठी सगळं काही करतात. त्यांनी माझ्यासाठी आता अमेरिकेत एक खूप मोठा बंगला बांधला आहे. थँक यू पाप्पा डोनाल्ड.” याचवेळी कोणीतरी काहीतरी बोलतं, त्याला उत्तर देताना राखी पुन्हा म्हणते, “बेंगलोर नाही… बंगलो.” राखी सावंतचा हा व्हिडीओ आता खूप व्हायरल होत आहे.
वाचा: हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड लवकरच देणार गूडन्यूज, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट
ट्रम्प पाप्पांनी फेव्हरेट कार भेट दिली – राखी सावंत
त्यानंतर राखी व्हिडीओमध्ये पुढे म्हणते, “मी लंडनला जात आहे, अमेरिकेला जात आहे. पाप्पा डोनाल्ड ट्रम्प यांनी मला माझी फेव्हरेट कार दिली आहे. ट्रम्प माझे पप्पा आहेत.” राखीच्या या व्हिडीओवर युजर्स मजोशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत आणि तान्या मित्तलचं नाव घेत तिची खिल्ली उडवत आहेत. काही युजर्स तर असंही म्हणत आहेत की या व्हिडीओद्वारे राखी तान्या मित्तलवर निशाणा साधत आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, “तान्या मित्तल प्रो.” तर दुसऱ्याने लिहिलं, “अमेरिकेची पुढची प्रेसिडेंट राखी ट्रम्प.” एकाने लिहिलं, “ही तान्या मित्तलपासून काही जास्तच प्रेरित झाली आहे.”
बिग बॉस 19 मध्ये राखी सावंतची एन्ट्री होणार?
राखी सावंत मुंबईत परतल्यापासून तिच्या पुन्हा बिग बॉसमध्ये एन्ट्रीच्या चर्चा आहेत. यापूर्वीही राखी सावंत बिग बॉसच्या तीन सीझनमध्ये दिसली आहे आणि आता चर्चा आहे की निर्माते मनोरंजनाचा तडका लावण्यासाठी चौथ्यांदा तिला शोमध्ये आणू शकतात. राखी सावंत पहिल्यांदा बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये दिसली होती. त्यानंतर ती बिग बॉस सीझन 14 आणि मग बिग बॉस सीझन 15 मध्येही दिसली होती. त्यामुळे जर ती आता शोमध्ये दिसली तर हे चौथ्यांदा घडणार आहे. यामुळे प्रेक्षकही खूप उत्साहित आहेत, कारण राखी जिथे असते तिथे ड्रामा भरपूर असतो.