हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड लवकरच देणार गूडन्यूज, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट
भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या सतत चर्चेत असतो. तो सध्या त्याच्या लव्ह लाईफमुळे खूप चर्चेत आहे. हार्दिक फॅशन मॉडेल माहिका शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. नुकतेच दोघांनी त्यांचे नाते अधिकृत केले आहे. आता हार्दिकच्या गर्लफ्रेंडने सोशल मीडिया पोस्टद्वारे गूडन्यूज दिली आहे.

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) जितका क्रिकेट मॅचेसमुळे चर्चेत असतो, त्याहून जास्त त्याच्या वैयक्तिक आयुष्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. हार्दिक पांड्या अनेकदा त्याच्या लव्ह अफेअर्समुळे चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे वादही झाले आहेत. एक्स-वाईफ नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) ला घटस्फोट दिल्यानंतर हार्दिक आता आयुष्यात पुढे गेला आहे आणि हार्दिकसोबत सध्या एक नवीन मॉडेल दिसत आहे. तिचे नाव माहिका शर्मा (Mahika Sharma) आहे. होय, हार्दिक पांड्या आणि मॉडेल माहिका शर्माच्या डेटिंगच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला आहे. क्रिकेटरसोबत मॉडेलला अनेकदा दिसली होती. इतकेच नव्हे, दोघे सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत आहेत आणि त्यांच्या फोटोमधून स्पष्ट दिसत आहे की, हार्दिक आणि माहिका एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. आता माहिका शर्मा गुड न्यूज देणार आहे आणि याबाबत तिने स्वतः सांगितले आहे.
काय आहे गुड न्यूज?
हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा सध्या व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. मालदीव (Maldives) मधील त्यांच्या रोमँटिक व्हेकेशनचे फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दोघे एकत्र दिसत आहेत आणि मजा करताना दिसत आहेत. याचदरम्यान माहिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, जी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. माहिकाने आपल्या मैत्रिणीची एक स्टोरी री-शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये माहिकाच्या मैत्रिणीने सांगितले की, त्यांनी लॅक्मे फॅशन वीकदरम्यान दिल्लीमध्ये माहिकाला खूप मिस केले.
वाचा: साराच्या बर्थडेच्या दिवशी सानियाने असं काही केलं की… अर्जुनही झाला आवाक!
माहिका शर्माने यावेळी दिल्लीत झालेल्या लॅक्मे फॅशन वीकला जाणे टाळले आहे. याचबाबत तिच्या मैत्रिणीने लिहिले की, ‘या सीझनमध्ये तुझी खूप आठवण आली, पण या घोषणेसाठी मी नेहमीच थांबलेली आहे.’ आपल्या मैत्रिणीच्या इन्स्टाग्राम स्टोरीला री-शेअर करताना माहिका शर्माने लिहिले की, ‘उफ्फ, हे किती प्रेमळ आहे. लवकरच तुम्हा सर्वांसोबत भेट होईल आणि होय, विश्वास ठेवा वाट पाहाणे व्यर्थ जाणार नाही.’ आता माहिकेचे हे बोलणे इशारा करत आहे की, ती खरेच लवकरच हार्दिकशी लग्न करणार आहे का किंवा यामागे काही वेगळे कारण आहे का?
हार्दिक पांड्यासोबत माहिकेचे रोमँटिक व्हेकेशन
हार्दिक पांड्याने माहिकासोबत रिलेशनशिप अधिकृत केल्यापासून दोघांची खूप चर्चा होत आहे. दोघे डिनर डेट्सवर एकत्र जात आहेत आणि दोघांना एअरपोर्टवरही एकत्र स्पॉट केले गेले आहे. आता माहिका आणि हार्दिक एकत्र मालदीवमध्ये आहेत. दोघेही फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दोघे पोज देत आहेत तर एका फोटोत माहिका आणि हार्दिक एकमेकांचा हात पकडलेले दिसत आहेत. तुम्हाला सांगतो की, हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा एक मॉडेल आहे आणि सोशल मीडियावर फॅशन कंटेंट तयार करते.
