साराच्या बर्थडेच्या दिवशी सानियाने असं काही केलं की… अर्जुनही झाला आवाक!
रविवारी सारा तेंडुलकरचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. दरम्यान, साराची होणारी वहिनी सानिया चंडोकच्या पोस्टने लक्ष वेधले आहे.

सचिन तेंडूलकरच्या लेकीला आता कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. काही ब्रँड्स आणि जाहिरातींसाठी केलेल्या शूटमुळे वयाच्या २८व्या वर्षी सारा लोकप्रिय झाली आहे. रविवारी साराचा वाढदिवस झाला. अनेकांनी साराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनी तर सोशल मीडियावर सारावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान, साराही होणारी वहिनी सानिया चंडोकने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले.
काय आहे सानियाची पोस्ट?
अर्जुन तेंडूलकरची होणारी बायको सानिया चंडोकने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून साराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तिने सारासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यावर तिने ‘माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे कॅप्शन दिले आहे. सानियाची ही पोस्टपाहून अर्जुन देखील खूश झाला असल्याचे म्हटले जात आहे. सध्या सोशल मीडियावर या पोस्टची चर्चा सुरु आहे.

Sara
साराला अर्जुन तेंडुलकर आणि वडील सचिन तेंडुलकर यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. अर्जुन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वीच साखरपुडा केला आहे. सानिया ही अर्जुनची लहानपणीची मैत्रिण आहे. सारा आणि सानिया या दोघींमध्येही चांगले नाते आहे. त्यांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. दोघीही व्हिडीओमध्ये मजामस्ती करताना दिसत होत्या. त्यामुळे सानिया आणि साराची यांची चांगली मैत्री असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
कोण आहे सानिया चंडोक?
सानिया चंडोक ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. घई हे हॉस्पिटॅलिटी आणि फूड इंडस्ट्रीमधील मोठे नाव आहे. तसेचे हे कुटुंबीय इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि लोकप्रिय आयस्क्रीम ब्रँड ब्रुकलिन क्रीमरीचे देखील मालक आहेत. सानियाचे स्वत:चे मुंबईत मिस्टर पॉज पेट स्पा एंड स्टोर एलएलपीमध्ये स्टॉकहोल्हर आहे.
