‘स्वतः तोंड काळं केलंय आणि म्हणते…’, कंगना राणौतला राखी सावंतने वाहिली शिव्याची लाखोली

सीजेपीच्या आंदोलनानंतर वातावरण अधिक तापलं आहे... भाजपच्या महिला खासदाराला बॉलिवूडची ड्रामाक्वीन राखी सावंत हिने शिव्याची लाखोली वाहिली आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत राखीने खासदाराच्या चारित्र्यावर बोट ठेवला आहे...

स्वतः तोंड काळं केलंय आणि म्हणते..., कंगना राणौतला राखी सावंतने वाहिली शिव्याची लाखोली
jराखी सावंत
| Updated on: Jul 29, 2026 | 9:31 AM

सीजेपीच्या आंदोलनापुढे सरकारला झुकावं लागलं आणि त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या लागल्या… आंदोलनात जेन झींना यश मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आजच्या पिढीचा विरोध केला आणि आजच्या पिढीच्या महिलांना गटर छाप, भ्रष्ट आणि अनेक पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या असं म्हटलं आहे… कंगना यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर वातावरण आणखी तापलं आहे… ज्यावर बॉलिवूडची ड्रामाक्वीन राखी सावंत हिने संताव व्यक्त करत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये राखी हिने थेट कंगनाच्या चारित्र्यावर बोट ठेवला आहे…

कंगनाच्या विरोधात काय म्हणाली कंगना राणौत?

इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत राखी सावंत म्हणते, माझ्या देशातील मुलींबद्दल काय बोलत आहेस, एक कानशिलात लगावलेली होती ना विमानतळावर… तुला भीती वाटत नाही, आणखी कानशिलात हव्या आहेत का? तुला सुरक्षा दिली आहे म्हणून माझ्या देशातल्या मुलींच्या विरोधात काहीही बोलशील काय? Z सेक्योरिटीच्या बळावर नको ते बोलत आहेस, तुझ्यात हिंमत असेल तर आम्ही फिरतो तसं, एकटी फिरुन दाखव तेव्हा तुला कळेल देशाची खरी ताकद… देशातील मुलांची ताकद… देशातील लोकांची ताकद…

देशाच्या मुलींवर बोट ठेवते, स्वतःचं चारित्र्य बघ… बॉलिवूडमध्ये काय काय केलं आहे. कोणा-कोणासोबत राहिली आहे, कुठे – कुठे तोंड काळं केलं आहे. स्वतःचं चारित्र्य बघ… माझ्या देशातील मुलींबद्दल म्हणायला तुझी लायकी आहे का? असं म्हणत राखी सावंत हिने कंगना राणौत यांच्यावर निशाणा साधला आहे…

काय म्हणाल्या कंगना राणौत? 

कंगना म्हणल्या, ‘आजच्या पिढीच्या स्त्रीयांना मी ‘जनरेशन गटर’ असं म्हणते. ज्यांनी वेस्टर्न कल्चर स्वीकारलं आहे. यांच्या कोणत्या विषयावर अभ्यास नाही आणि त्या दिसायला देखील सुंदर नाही, त्यांची मानसिकता देखील चांगली नाही… त्यांचे विचार इतके भ्रष्ट आहेत की, त्या उत्तम गृहिणी देखील होऊ शकत नाहीत. या महिलांकडे समाजाला देण्यासाठी काहीही नाही. असं असताना ड्रग्ज घेणं, दारु पिणं आणि अनेकांशी शारीरिक संबंध ठेवत, त्या आपल्या स्वातंत्र्याचे प्रदर्शन गर्वाने करतात.’ एवढंच नाही तर, आई वडिलांच्या कमाईवर स्वतःचे स्वतंत्र विचार मांडतात…’ असं देखील कंगना पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us