Ramayana Box Office Collection Day 15: आदिनाथ कोठारे स्टारर ‘रामायण’ने 8 ब्लॉकबास्टर सिनेमांना टाकलं मागे, तिसऱ्या गुरुवारी मोडला रेकॉर्ड
Ramayana Box Office Collection Day 15: अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी स्टारर 'रामायण' सिनेमात आदिनाथ कोठारे याने देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत सिनेमाने तब्बल 8 ब्लॉकबास्टर सिनेमांना मागे टाकलं आहे. सलग तिसऱ्या गुरुवारी सिनेमाने रेकॉर्ड मोडला आहे.

Ramayana Box Office Collection Day 15: दिग्दर्शक नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ सिनेमाचा पहिला भाग बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. 5 नोव्हेंबर रोजी सिनेमा प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी सिनेमाने मोठा रेकॉर्ड मोडला. फक्त 15 दिवसांमध्ये सिनेमाने तब्बल 850 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. सिनेनाने आता 900 कोटी रुपयांच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. प्रदर्शनानंतर 15 दिवसांनंतर सिनेमाची बॉक्स ऑफिसवर असलेली मजूबत पकड चर्चेचा विषय ठरत आहे. तर जाणून घ्या 15 व्या दिवशी सिनेमाने किती कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.
‘रामायण’ सिनेमाची 15 व्या दिवसाची कमाई?
बॉक्स ऑफिसवर सिनेमाच्या कमाईचा आकडा वाढतानाच दिसत असून, सिनेमाची क्रेझ प्रेशकांमध्ये अद्यापही आहे. फक्त शनिवार आणि रविवारीच नाही तर, कामाच्या दिवसांमध्ये देखील प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘रामायण’ सिनेमाची चर्चा रंगलेली आहे.
सैकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘रामायण पार्ट 1’ ने प्रदर्शनाच्या 15 व्या दिवशी 19.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह या सिनेमाची भारतातील 15 दिवसांची एकूण निव्वळ कमाई आता 863.75 कोटी रुपये झाली आहे.
बॉक्स ऑफिसवर सिनेमाची कमाई
पहिला आठवडा: 564.60 कोटी
9 वा दिवस: 48.10 कोटी
10 वा दिवस: 75.90 कोटी
11 वा दिवस: 75 कोटी
12 वा दिवस: 32 कोटी
13 वा दिवस: 28.60 कोटी
14 वा दिवस: 23.20 कोटी
15 वा दिवस: 19.35 कोटी
‘रामायण’ ठरला तिसऱ्या गुरुवारी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा
‘रामायण’च्या कमाईत 15 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या गुरुवारी जरी काहीशी घट झाली असली, तरी या सिनेमाने पुन्हा एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 19.35कोटी रुपयांची कमाई करत हा सिनेमा तिसऱ्या गुरुवारी सर्वाधिक कलेक्शन करणारा बॉलिवूडचा दुसरा सिनेमा ठरला आहे. यासोबतच त्याने ‘धुरंधर 2’ (19 कोटी), ‘स्त्री 2’ (8.5 कोटी), ‘गदर 2’ (8.10 कोटी) यांसह 8 ब्लॉकबस्टर सिनांच्याच्या तिसऱ्या गुरुवारच्या कलेक्शनला मागे टाकलंआहे.
तिसऱ्या गुरुवारी सर्वाधिक कमाई करणारे सिनेमे
धुरंधर- 28.6 करोड़ रुपये
रामायण- 19.35 कोटी रुपये
धुरंधर 2-19 कोटी रुपये
स्त्री 2- 8.5 कोटी रुपये
गदर 2- 8.10 कोटी रुपये
जवान- 7.95 कोटी रुपये
पठान- 5.95 कोटी रुपये
छावा- 5.51 कोटी रुपये
पद्मावत- 5 कोटी रुपये
बागी 2-3.81 कोटी रुपये