Ramayana Box Office Collection: तिसऱ्या दिवशी Ramayana ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, शनिवारी आदिनाथ कोठारेच्या सिनेमावर धनवर्षा

Ramayana Box Office Collection: 'रामायण' सिनेमा बॉक्स ऑफिसवर नवीन इतिहास रचताना दिसत आहे. सलग तिसऱ्या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि आदिनाथ कोठारे यांच्या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Ramayana Box Office Collection: तिसऱ्या दिवशी Ramayana ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, शनिवारी आदिनाथ कोठारेच्या सिनेमावर धनवर्षा
Ramayana
| Updated on: Nov 08, 2026 | 8:14 AM

Ramayana Box Office Collection : अभिनेता रणबीर कपूर, यश आणि मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे स्टारर ‘रामायण’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. एकापेक्षा एक स्टारकास्ट असलेला ‘रामायण’ हा ऐतिहासिक सिनेमा 5 नोव्हेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाला समिक्षक आणि प्रेक्षकांकडून देखील सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहे. तर बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमा उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. आता सिनेमाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहेत.

तिसऱ्या दिवशी ‘रामायण’ सिनेमा किती कोटींची कमाई केली?

Loading...

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, रामायण (Ramayana) सिनेमाने पहिल्या दिवशी 64.85 कोटी रुपायांचं कलेक्शन केलं. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत घट झाली. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी सिनेमाने कमी कमाई केली. सिनेमाने दुसऱ्या दिवशी 48.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला, तर शनिवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत पुन्हा वाढ झाली. तिसऱ्या दिवशी सिनेमाने 62.04 कोटींची कमाई केली.

तीन दिवसांच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने तीन दिवसांत 174.94 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर ग्रॉस कलेक्शन 208.01 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. सांगायचं झालं तर, नितीश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ सिनेमा देशांतर्गत आणि जागतिक बॉक्स ऑफिसवर अत्यंत चांगली कामगिरी करत आहे. या सिनेमाने जगभरात 221.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘रामायण’ सिनेमा

‘रामायण’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ‘रामायण’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, नमित मल्होत्रा निर्मित आणि यश याने सिनेमा ग्लोबल लेवलवर प्रदर्शित केलं आहे. जगभरातील 100 देशातील जवळपास 50 हजारपेक्षा जास्त स्क्रिनवर सिनेमा प्रदर्शित झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, दोन भागांत तयार होत असलेल्या या रामायण सीरिजचं एकूण बजेट जवळपास 4000 कोटी रुपये आहे.

व्हीएफएक्स (VFX) आणि सिनेमॅटिक भव्यतेच्या बाबतीत ही भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठी मालिका मानली जात आहे. याचा पहिला भाग 5 नोव्हेंबर 2026 रोजी रिलीज झाला असून, ‘रामायण: पार्ट 2’ सन 2028मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. आता ‘रामायण’ सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us