Ramayana: साई पल्लवीला सीता बनवण्यावर ज्यांना आक्षेप, त्यांना धनुषने दिलं उत्तर
Ramayana: दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी 'ओम' सिनेमाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात साई पल्लवीचं भरभरून कौतुक केलं. नितीश तिवारी यांच्या 'रामायण' सिनेमात 'माता सीता'च्या भूमिकेसाठी साई पल्लवीची निवड करण्याबाबत उपस्थित केले जाणारे प्रश्न निराधार आहेत, असं धनुषने म्हटलं आहे.

Ramayana: दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष सध्या सर्वत्र चर्चेत आहे. अभिनेत्याचा ‘ओम’ सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्री साई पल्लवी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार. दरम्यान, सिनेमाच्या एका प्री-रिलीज इव्हेंटदरम्यान धनुषने साई पल्लवीचे कौतुक करताना स्पष्ट केले की, ‘रामायण’ या सिनेमातील आई सीतेच्या भूमिकेसाठी साईच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करण्याला काहीच अर्थ नाही. धनुष याने ठाम शब्दांत सांगितलं की, संपूर्ण भारतात शोध घेतला तरीही या सीतेच्या भूमिकेला साई पल्लवीपेक्षा उत्तम न्याय दुसरी कोणतीही अभिनेत्री देऊच शकली नसती.
साई पल्लवी हिचं कौतुक करत धनुष म्हणाला, ‘साई अशा उभी होती, जणू तिने सिनेविश्वाच्या कलेवर पूर्णपणे प्रभुत्व मिळवलं आहे. तिचं संयम, शालीनता आणि तिच्या हावभावातून अप्रतिम आत्मविश्वास ओसंडून वाहत होता, जो खरोखरच थक्क करणारा होता. ही भूमिका साकारणं मुळीच सोपं नव्हतं, पण त्यांनी मोठ्या हिंमतीने हे आव्हान स्वीकारलं आणि ते अत्यंत उत्कृष्ट रीतीने पेललं.’
पुढे ‘रामयण’ सिनेमासाठी शुभेच्छा देत धनुष म्हणाला, ‘सीतेच्या भूमिकेसाठी त्यांच्या कास्टिंगबद्दल बरीच वायफळ चर्चा सुरू आहे, जी माझ्या समजुतीच्या पलीकडची आहे. चर्चा का सुरु आहे, ते मला कळत नाही. साई पल्लवी तर शूटिंगदरम्यान शॉटमधील ब्रेकमध्ये देखील सतत पूजा-अर्चा आणि प्रार्थना करत असते. ती अत्यंत निर्मळ मनाची व्यक्ती असून तिचा देवावर मोठा विश्वास आहे. ती पडद्यावर अतिशय सुंदर दिसते आणि एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे.’, असं देखील धनुष म्हणाला.
सीबीआय अधिकारी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार साई पल्लवी…
‘ओम’ सिनेमा साई पल्लवी सीबीआय अधिकारी नित्या रेड्डी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्यांच्यावर लाल चंदनाच्या अवैध तस्करीची चौकशी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली असते. सिनेमाच्या पहिल्या झलकमध्ये त्यांच्या पात्राचा भूतकाळ आणि त्यांना हा तपास पुढे नेण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या नुकसानाची एक झलक दाखवण्यात आली आहे. याच तपासादरम्यान त्यांचा सामना धनुष आणि ममुटी यांच्याशी होता. हा सिनेमा 20 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. ‘रामायण’ नंतर साई ‘ओम’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.