AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Gavaskar: गंभीरचा तो एक निर्णय टीम इंडियासाठी ठरला फ्लॉप, गावस्कर म्हणाले असूदेत…असं का?

Sunil Gavaskar To Gautam Gambhir: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना काल रंगला. या सामन्यात गौतम गंभीरने एक निर्णय घेतला जो फ्लॉप ठरला त्यावर आता गावस्करांनी आपले मत मांडले आहे.

Sunil Gavaskar: गंभीरचा तो एक निर्णय टीम इंडियासाठी ठरला फ्लॉप, गावस्कर म्हणाले असूदेत...असं का?
| Updated on: Nov 08, 2026 | 10:37 AM
Share

Sunil Gavaskar On Team India: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. दोन सामने खेळवले गेले जे दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले. दोन्ही सामन्यात पाऊस पडल्याने डीएलएस पद्धतीने याचा निकाल देण्यात आला आहे. दुसऱ्या सामना भारतीय संघाच्या फलंदाजीत काही बदल पाहायला मिळाले. यानंतर माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी आता एक विधान केले आहे.

महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना पाठिंबा दिला आहे. वेलिंग्टनमध्ये भारतीय संघ १३५ धावांचे लक्ष्य गाठत असताना, संघ व्यवस्थापनाने केएल राहुलला फलंदाजीच्या क्रमात खाली पाठवून अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. या निर्णयावर जोरदार टीका झाली, पण गावस्कर यांचे मत वेगळे आहे.

३९ धावांवर भारतीय संघाची तिसरी विकेट पडली. केएल राहुल सहसा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो, पण जेव्हा अक्षर पटेल फलंदाजीला आला, तेव्हा सोशल मीडियावर गंभीर यांच्यावर टीका केली गेली. गावस्कर म्हणतात की, गोलंदाजांची लय बिघडवण्यासाठी अक्षरला पाचव्या क्रमांकावर पाठवणे हा एक धोरणात्मकदृष्ट्या योग्य निर्णय होता.

सामन्यानंतर सुनील गावस्कर म्हणाले, “जर डावखुरा फलंदाज फलंदाजीला आला, तर गोलंदाजांना अडचण येईल कारण त्यांना आपली लाईन आणि लेंथ बदलावी लागेल. असे करण्याचा प्रयत्न केल्यास उजव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजाची लय बिघडू शकते. यामुळे धावा काढण्याच्या अधिक संधी निर्माण होतात.” आकडेवारीनुसार, अक्षरला वरच्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय चांगला नव्हता, कारण तो १७ चेंडूंमध्ये केवळ ७ धावाच करू शकला.

गावस्कर काय म्हणाले?

गावस्कर म्हणाले की, “अशा निर्णयांमध्ये काहीही चुकीचे नसते.जर अक्षरने धावा केल्या असत्या, तर लोकांनी कदाचित म्हटले असते, गदकाय उत्तम कर्णधारपद आहे!’ अशा योजना कधीकधी यशस्वी होतात आणि कधीकधी अयशस्वी. तुम्हाला माहित होते की संघात केएल राहुलसारखा एक महान खेळाडू शिल्लक आहे, ज्यामुळे तुम्हाला प्रयोग करण्याची संधी मिळाली.”

अक्षर पटेलला वेळोवेळी वरच्या क्रमांकावर बढती देण्यात आली आहे. २०२४ टी-२० विश्वचषक अंतिम सामना हा त्यापैकीच एक सामना होता. अंतिम सामन्यात भारताची अवस्था ३४ धावांवर ३ गडी बाद अशी झाली होती. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने ४७ धावांची मोलाची खेळी केली आणि विराट कोहलीसोबत ७२ धावांची सामना जिंकून देणारी भागीदारी केली.

Follow Us
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत,
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील नेत्याच...
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ..
Diwali 2026 : भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ...
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!