बॉलिवूड सोडा, या पहिल्या मराठमोळ्या अभिनेत्याने जुहूमध्ये बांधलेला आलिशान बंगला
चाहत्यांमध्ये कायम सेलिब्रिटींच्या लाईफस्टाईलबद्दल चर्चा रंगलेली असते. अशात बॉलिवूड सेलिब्रिटींच्या श्रीमंतीच्या चर्चांना उधाण आलेलं असतं... पण एक मराठमोळा अभिनेता असा देखील होता, ज्याने जुहूमध्ये स्वतःचा आलिशान बंगला बांधलेला.

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी आहेत, जे आलिशान आणि भव्य बंगल्यात राहतात. मुंबई सारख्या शहरात त्यांचे बंगले आहे. महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता शाहरुख खान, अजय देवगन, दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचे मुंबईत आलिशान बंगले आहे. तर अन्य सेलिब्रिटी देखील मुंबई आलिशान फ्लॅटमध्ये राहतात. पण मराठी सिनेविश्वात असा पहिला अभिनेता होता, त्याने जुहू सारख्या पॉश परिसरात स्वतःचा भव्य बंगला बांधला. आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, तो अभिनेता नक्की कोण होती. तर सध्या ज्या मराठमोठ्या अभिनेत्याच्या बंगल्याची चर्चा रंगली आहे, तर ते दुसरे तिसरे कोणी नाही तर, दिवंगत अभिनेते रमेश देव आहे. रमेश देव यांच्या निधनानंतर त्यांची पुढची पिढी सिनेविश्वात सक्रिय आहे.
रमेश देव यांचा मुलगा आणि अभिनेते अजिंक्य देव यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, त्यांच्या जुहू येथील बंगल्याबद्दल सांगितलं. सांगायचं झालं तर, प्रकाश देव यांनी बंगला 1970 साली जुहू येथे बांधलेला. जवळपास 50 वर्षांपूर्वी प्रकाश देव यांनी मुंबईतील जुहू सारख्या परिसरात बंगला बांधून स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या घराला ‘देवघर’ असं म्हटलं जातं… तर धर्मेंद्र यांच्या बंगल्याला तेव्हा ‘धर्मशाळा’ म्हणायचे, तर प्रकाश देव यांच्या घराला ‘देवघर’ असं म्हटलं जायचं…
सांगायचं झालं तर, आई – वडील दोघांच्या व्यस्तवेळापत्रकामुळे अजिंक्य देव त्यांच्या नातेवाईकांसोबत राहायचे… तर त्यांचे नातेवाईक देखील बंगल्यातच राहायचे… अजिंक्य देव म्हणाले, ‘आमचं जॉइंट घर होंत… धर्मेंद्र यांच्या बंगल्याला तेव्हा ‘धर्मशाळा’ म्हणायचे, तर प्रकाश देव यांच्या घराला ‘देवघर’ म्हणायचे. आमचे नातेवाईक सगळे आमच्या बरोबरच राहायचे. तेव्हा आमचं संगोपन त्यांच्याच बरोबर झालं, कारण आई-बाबा सतत बाहेर असायचे.’
पुढे अजिंक्य देव म्हणाले, ‘माझे बाबा पहिले मराठी कलाकार होते, ज्यांनी जुहूमध्ये स्वतःचं घर बांधलं. ही गोष्ट 70 – 71 वर्षांची आहे. तेव्हा तर जुहूमध्ये घर म्हणजे…, त्या घरात माझे मामा, मावशी सगळेच राहायचे.. आमच्याबरोबर आणि सुट्टीमध्ये एकेवेळेला आमच्या घरी 20 लोकं असायची… मोठं घर होतं…’ असं देखील अजिंक्य देव म्हणाले.
देव कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, एक काळ असा होता, जेव्हा मराठी सिनेविश्वावर रमेश देव आणि सीमा देव यांचं राज्य होतं. रमेश देव आणि सीमा देव यांच्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अजिंक्य देव यांनी अभिनय विश्वात पदार्पण केलं, ते आता ‘रामायण’ सिनेमात देखील झळकणार आहेत. तर दुसरा मुलगा अभिनय देव हे दिग्दर्शक आणि निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहेत.