
प्रसिद्ध कॉमेडिअन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे, पण तो काही अप्रिय कारणांमुळे. एका एपिसोडमध्ये युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया सहभागी झाला आणि त्याने आई-वडीलांबद्दल अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह प्रश्न विचारसा. त्यामपुळे सोशल मीडियावरही बराच गदारोळ सुरू आहे. रणवीरच्या या अश्लील कमेंटमुळे तो प्रचंड ट्रोल होत असून जनसामांन्यांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटीजपर्यंत अनेकांनी या वक्तव्यावर नाराजी वर्तवली आहे. याप्रकरणी समय रैना आणि रणवीर याच्याविरोधात FIRही दाखल झाली आहे. तसेच याप्रकरणात पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अपूर्वा मखीजाचीही चौकशी करण्यात आली आहे.
पोलिसांनी अपूर्वा माखिजाची सुमारे 2 तास चौकशी केली. अपूर्व माखिजानेही ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये अत्यंत अश्लील कमेंट केली होती. शोमध्ये आलेल्या एका स्पर्धकालाही तिने शिवीगाळही केली. अपूर्वाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या याच एपिसोडमध्ये उपस्थित असलेल्या आशिष चंचलानी याचा जबाबही काल नोंदवण्यात आला. शोच्या पॅनलमध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांची मुंबई पोलीस चौकशी करत आहेत.
30 लोकांविरुद्ध FIR दाखल
अनिल कुमार पांडे यांनी महाराष्ट्र सायबर पोलिसात इंडियाज गोट लेटेंट शो विरोधात एफआयआर दाखल केला. या शोच्या सर्व भागांची चौकशी करून महाराष्ट्र सायबर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 30 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हे सर्व लोक या शोचे जज होते. एएनआयनुसार, मंगळवारी पोलिसांचे एक पथक रणवीर अलाहबादियाच्या घरी चौकशीसाठी पोहोचले होते.
अश्लील कमेंट्समुळे मोठा हंगामा
या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने विचारलेल्या प्रश्नामुळे सर्वात जास्त गदारोळ माजला आहे, त्याच्या अश्लील प्रश्नामुळे अनेक लोक भडकले आहेत. पोलिस याप्रकरणी सर्वांचे जबाब नोंदवत आहेत. समय रैनाच्या शोमध्ये अपूर्,वा रणवीर आणि आशिष हे पोहोचले होते. या शोमध्ये अपूर्वने आईबद्दल अतिशय अश्लील विधाने केली होती, ज्यामुळे तिच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. अपूर्वा माखिजाच्या यूट्यूब पेजचे नाव रिबेल किड आहे आणि लॉकडाऊन दरम्यान तिला खूप प्रसिद्धी मिळाली. अपूर्वा ही फॅशन, प्रवास आणि अनोखा कंटेंट तयार करण्यासाठी ओळखली जाते. ती स्वतःला ‘कलेशी स्त्री’ म्हणवून घेते. कलेशी औरत या नावानेही तिने अनेक कंटेंट तयार केले आहेत.
रणवीरच्या ज्या विधानावरून गदारोळ झाला तो वादग्रस्त एपिसोड युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. वाद वाढल्यानंतर रणवीरने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत जाहीर माफीसुद्धा मागितली होती.