रणवीरने यशराज फिल्म्ससोबतचं नातं तोडलं; ‘बँड बाजा बारात’मुळे बनला होता स्टार

| Updated on: Nov 04, 2022 | 5:27 PM

12 वर्षांनंतर रणवीर सिंगने निवडली वेगळी वाट; यशराज फिल्म्ससोबतचा करार संपुष्टात

रणवीरने यशराज फिल्म्ससोबतचं नातं तोडलं; बँड बाजा बारातमुळे बनला होता स्टार
Ranveer Singh
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई- अभिनेता रणवीर सिंग आणि यशराज फिल्म्स यांच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. रणवीरने ‘यशराज फिल्म्स’शी असलेलं नातं तोडल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या 12 वर्षांपासून यशराज फिल्म्स टॅलेंट कंपनी ही रणवीरचं काम पाहत होती. याच कंपनीच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं आणि रातोरात स्टार झाला होता. मात्र आता रणबीरने यशराज फिल्म्ससोबत असलेला करार संपुष्टात आणला आहे.

काही दिवसांपूर्वीच यशराज बॅनरअंतर्गत प्रदर्शित झालेल्या ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात रणवीरने काम केलं होतं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. रणवीरच्या यशामध्ये यशराज फिल्म्स आणि आदित्य चोप्रा यांचा मोठा वाटा असल्याचं म्हटलं जातं. त्यांच्याच चित्रपटांमुळे रणवीरला बॉलिवूडमध्ये यश मिळालं. 2010 मध्ये रणवीरला यशराज फिल्म्सनेच इंडस्ट्रीत लाँच केलं होतं.

रणवीरने जरी यशराज फिल्म्ससोबतचा करार संपुष्टात आणला असला तरी आदित्य चोप्रासोबतचं त्याचं नातं कायम राहणार आहे. भविष्यात यशराज फिल्म्सकडे एखादी चांगली कथा आली आणि त्या भूमिकेत रणवीर चोख बसत असेल तर त्याला संधी नक्कीच देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

बँड बाजा बारातशिवाय रणवीरने यशराज फिल्म्सच्या ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा नाही चालला. मात्र त्यातील रणवीरचं अभिनय प्रेक्षकांना खूप आवडलं होतं. 2016 मधील आदित्य चोप्राची ‘बेफिक्रे’सुद्धा फ्लॉप झाली होती. या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘जयेशभाई जोरदार’लाही यश मिळालं नाही. एकूणच एक चित्रपट सोडता इतर तीन चित्रपट फ्लॉप झाले आहेत.

रणवीरने यशराजव्यतिरिक्त संजय लीला भन्साळी आणि रोहित शेट्टी यांच्यासोबतही काम केलं. पद्मावत, बाजीराव मस्तानी, सिम्बा यांसारखे चित्रपट तुफान गाजले. रणवीर लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे.