Raqesh Bapat: ‘नवरी मिळे हिटलरला’च्या तुफान यशानंतर राकेश बापटची नवी मालिका; साकारणार ही भूमिका

Raqesh Bapat: 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेच्या तुफान यशानंतर अभिनेता राकेश बापट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी तो अभिमान सरदेसाई ही भूमिका साकारणार आहे.

Raqesh Bapat: नवरी मिळे हिटलरलाच्या तुफान यशानंतर राकेश बापटची नवी मालिका; साकारणार ही भूमिका
राकेश बापटची नवी मालिका
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 01, 2026 | 9:39 AM

मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारा अभिनेता राकेश बापट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील एजेच्या भूमिकेनं प्रेक्षकांची पसंती मिळवल्यानंतर आता राकेश एका नव्या आणि दमदार भूमिकेत दिसणार आहे. राकेशच्या वाढदिवसानिमित्त स्टार प्रवाह वाहिनीने त्याच्या चाहत्यांना खास सरप्राईज देत नव्या मालिकेची घोषणा केली आहे. ‘तुझ्याकडे तुला मागणे’ असं या नव्या मालिकेचं नाव असून, राकेश या मालिकेत अत्यंत प्रभावी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व साकारणार आहे. त्यामुळे राकेशच्या नव्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.

अभिराम जहांगीरदारनंतर आता साकारणार अभिमान सरदेसाई

या मालिकेत राकेश बापटच्या पात्राचं नाव अभिमान सरदेसाई असणार आहे. अभिमान हा केवळ यशस्वी उद्योजक नसून राजकारणातही सक्रिय असलेला नेता आहे. त्याची प्रतिमा अतिशय प्रामाणिक आणि स्वच्छ आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या आयुष्यातील उद्योजक आणि राजकीय नेता अशा दोन्ही बाजू राकेश आपल्या अभिनयातून कशा प्रकारे उलगडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राकेशने यापूर्वीही विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मात्र, ‘तुझ्याकडे तुला मागणे’मधील अभिमान सरदेसाई हे पात्र त्याच्या कारकिर्दीतील वेगळ्या धाटणीचं ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या भूमिकेत त्याचा रुबाबदार अंदाज आणि व्यक्तिमत्त्वाची वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मालिकेचा प्रोमो-

राकेश बापटचा वाढदिवस त्याच्यासाठी यंदा खास ठरला आहे. वाढदिवसाच्याच दिवशी स्टार प्रवाहकडून त्याच्या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. त्यामुळे राकेशच्या चाहत्यांसाठीही हा दिवस खास ठरला. नव्या मालिकेची पहिली झलक समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही या मालिकेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये राकेश ‘सिंगल फादर’च्या भूमिकेत दिसत आहे. ‘ईशानचा बाबा ही मीच आणि आई सुद्धा मीच,’ असं तो म्हणतोय.

अभिमान सरदेसाईच्या आयुष्यातील नेमकी कथा काय असेल? त्याचा व्यवसाय आणि राजकारण यांचा परस्परांशी काय संबंध असेल? तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कोणते चढ-उतार येणार, याची उत्सुकता आता वाढली आहे. त्यामुळे ‘तुझ्याकडे तुला मागणे’ ही मालिका राकेश बापटच्या चाहत्यांसाठी नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे.

Follow Us