त्यांच्या हिंदुत्वाच्या विकृतीत… प्राजक्ताच्या पोस्टवर नेटकरी भडकले
सध्या मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता हनमघर ही चांगलीच चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्याने काहींनी तिच्यावर निशाणा साधला. पण आता प्राजक्ताला ट्रोल करणाऱ्यांवर नेटकरी भडकले आहेत.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता हनमघर. तिने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अनेक मुद्द्यांवर स्पष्ट मत मांडले. त्यानंतर अनेकांनी प्राजक्तावर निशाणा साधला. पण नंतर प्राजक्तााला अभिनेता, लेखक पंकज पंचारियानी पाठिंबा दिला. प्राजक्ताने पंकजने लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. आता नेटकरी देखील प्राजक्ताला पाठिंबा देताना दिसत आहेत.
प्राजक्ताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पंकजची पोस्ट शेअर केली. ती पोस्ट पाहून अनेकांनी तिला ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे. एका यूजरने कमेंट करत, त्यांच्या हिंदुत्वात विकृतीच आहे म्हणून विरोधी विचारांना याच भाषेत बोलून त्यांना आनंद मिळतो अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, हा कसला इन्फ्लुएन्सर हा तर पेड ट्रोलर. काल जरांगेच्या टेप मुळे सगळं उघडं पडलंय. त्याला महत्व देण्यासारखा नव्हतच तरीही उघडा नागडा केला त्याबद्द्ल धन्यवाद अशी कमेंट केली आहे. आणखी एका यूजरने कमेंट करत, नीच जमात आहे ही चांगले संस्कार असल्याचा बुरखा पांघरून बसलेली नीच जमात. असा कधी ना कधी खरा चेहरा बाहेर पडतो असे म्हटले आहे.
काय होती सोशल मीडियावरील पोस्ट?
पुरुषी संस्कृतीच्या उदात्तीकरणाचा अतिरेक होतो, तेव्हा काँग्रेस-भाजप करत बसायचे का? खालील पोस्टमध्ये सचिनभाऊ म्हणतात, “प्राजक्त, तू हिजडा आहे.” व्याकरणाच्या चुकांवर बोलणे टाळूया. प्राजक्ताच्या विचारधारेचा आदर असला पाहिजे, पण म्हणून तिच्याबद्दल अशी भाषा वापरणे योग्य आहे का? ‘हिजडा’ हा शब्द अरबी ‘हिजराह’ (वेगळ्या वाटेने प्रवास करणारा) शब्दाचा अपभ्रंश आहे. महाभारतात शिखंडी हा जगातला पहिला किन्नर राजा होता. पण सचिनभाऊ वाचत नाहीत! असो, शेवटी आपला भाऊ आहे, त्याला सांभाळणे आपली जबाबदारी आहे. आपल्या रागासाठी, सचिनभाऊ, तुम्ही कोणत्याही लिंगभावात्मक समुदायाला शिवी म्हणून वापरू शकत नाही; कारण सीमा आनंद (सेक्स थेरपिस्ट) म्हणतात की, जगातला प्रत्येक पुरुष हा उभयलिंगी (Bisexual) असू शकतो.
आता भाऊ, तू म्हणाला की, “ही समलिंगी आहे.” अरे सचिनभाऊ, समलिंगी ही शिवी नाही होऊ शकत! ती एक लैंगिक स्थिती (Sex Condition) आहे. कंडिशनला शिवी बनवता येत नाही. तू हुशार नाही म्हणून मी तुला प्रेमाने ‘दगड’ किंवा ‘सुकलेला गु’ म्हटले असते, पण तुला राग आला म्हणून मी तुला समलिंगी कसे म्हणू? अजंठा-वेरूळच्या लेण्यांमध्ये तुला समलिंगी शिल्पेही दिसतील. जरा अभ्यास केला की किती मस्त बोलता येते!
L – Lesbian (लेस्बियन)
G – Gay (समलिंगी पुरुष)
B – Bisexual (उभयलिंगी)
T – Transgender (ट्रान्सजेंडर)
Q – Queer (वेगळे – समुदायाने त्याला सन्मानाचा दर्जा दिला.)
A – Asexuality (लैंगिक भावना नसणे – हा आजार नाही, नैसर्गिक भावना आहे.)
I – Intersex (लिंग अस्पष्ट असणाऱ्या व्यक्ती.)
मला शाळेत सेक्स एज्युकेशन शिकवले नाही, पण जगात खूप अभ्यास करता येऊ शकतो. प्राजक्ता ही माझी चांगली मैत्रीण आहे, पण विचारांच्या खिडकीतून आमचे विचार वेगळे आहेत. म्हणून तिला चुकीच्या सेक्स भावात नेऊन बसवू नकोस.
समलिंगी असणे हा गुन्हा नाही. विरुद्ध लिंगी असणे ही काही अभिमानास्पद गोष्ट नाही. जर विरुद्ध लिंगी लोकच महान असते, तर बाबा बंगालीकडे गुपचुप जाऊन लिंग ताठरण्याच्या गोळ्या लोक कशाला घ्यायला गेले असते?
सचिनभाऊंसारख्या लोकांमुळे लॉकडाऊनमध्ये ९ समलिंगी लोकांनी स्वत:चे जीवन संपवले मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. सारंग पुणेकर (भारतातली पहिली ट्रान्सजेंडर् जिने पुणे विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले) सारखी मैत्रीण सुद्धा गेलेली मी पाहिली आहे. मित्रा, असे नका वागू! अक्कल असेल तर समानतेने जगा आणि जगू द्या. टीप :- मला कोणत्याच राजकीय विचारांशी देणेघेणे नाही. लैंगिक समानता असावी, इतकीच साधी अपेक्षा आहे.
