सोनाली कुलकर्णी हिने अमिताभ बच्चन यांच्याकरिता घेतला मोठा निर्णय, म्हणाली मी..
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकताच मोठा खुलासा केला. अभिनेत्रीने अमिताभ बच्चन यांच्या आठवणीत आपण एक खास गोष्ट जपून ठेवल्याचे म्हटले. आता अभिनेत्रीने यावर भाष्य केले.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. सोनालीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनालीने अनेक कलाकारांसोबत काम केले. विशेष म्हणजे सोनाली कुलकर्णी ही बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची मोठी चाहती आहे. सोनालीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या आठवणीला उजाळा देताना दिसली. सोनाली कुलकर्णी हिने म्हटले की, काही कलाकार माझे खूप जवळचे आहेत आणि चांगले मित्रही आहेत. त्यात आमिर खान, उर्मिला मातोंडकर, ऐश्वर्या राय हे माझे मित्र आहेत. मी अमिताभ बच्चन सरांची खूप मोठी चाहती आहे. मी त्यांच्यासाठी माझा फोन विकला नाहीये. तो फोन मी माझ्याकडे आजही जपून ठेवला.
कारण त्या फोनमध्ये खूप सुंदर मेसेज आहे. त्या मेसेजमुळेच मी फोन विकू शकले नाही. मला 102 Not Out हा अमिताभ बच्चन यांचा चित्रपट खूप जास्त आवडला. मी त्यावेळी त्यांना एक खास पदार्थ बनवून पाठवला होता. यासोबतच मी चिठ्ठीही पाठवली होती. त्यानंतर त्यांनी मला रिप्लाय केला.
तो माझा जुना फोन अजूनही आहे. अमिताभ बच्चन सरांनी जो मेसेज मला पाठवला होता, तो मी अजूनही जपून ठेवला. तो मेसेत मला हवा असल्याने तो जुना फोन मी अजूनही विकला नाही. तो फोन मी स्वत:कडे जपून ठेवला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. तिने आपले जवळचे मित्र कोण आहेत, यावर भाष्य केले.
सोनाली कुलकर्णी हिने बॉलिवूडमध्ये नक्की कोण कोण आपले जवळचे मित्र आहे, हे सांगितले. पुण्यातील विद्यानंद बापट यांनी डिजेला विरोध केला होता, त्यावेळी अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. पण विद्यानंद बापट यांच्या समर्थनासाठी सोनाली कुलकर्णी मैदानात उतरली. तिने याबाबत एक पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली. शाबास म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली. जागरूक नागरिकाची व्याख्या नव्याने त्यांनी मांडल्याचे तिने म्हटले.
