AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jitendra Avhad: कोण पळवतंय तुमच्या हक्काचं पाणी? जितेंद्र आव्हाडांनी ऐन दुष्काळात थेट मुद्यालाच घातला हात

Jitendra Avhad on Water Theft: शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ऐन दुष्काळात मोठ्या मुद्दाला हात घातला आहे. काही नेते आणि आमदार पाणी पळवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. दुष्काळात पाणी नियोजनाचा पार बोजवारा उडाल्याचा आरोपही त्यांनी केला.

Jitendra Avhad: कोण पळवतंय तुमच्या हक्काचं पाणी? जितेंद्र आव्हाडांनी ऐन दुष्काळात थेट मुद्यालाच घातला हात
कोण पळवतंय तुमच्या हक्काचं पाणी? जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा काय?
| Updated on: Oct 25, 2026 | 1:16 PM
Share

Jitendra Avhad on Water Theft: राज्यात विविध राजकीय मुद्दे तापलेले आहेत. राजकीय बॉम्ब फुटत आहेत. दुष्काळाचा मुद्दा जणू गेल्या चार ते पाच दिवसात गायब झाला आहे. त्याचवेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका ज्वलंत विषयाला हात घातला आहे. राज्यात पाणी नियोजनाचा बोजवारा उडाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर आमदार आणि पदाधिकारी हे पाणी पळवून नेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. येत्या काही दिवसात पाण्याचा प्रश्न बिकट होण्याकडे त्यांनी जनतेचे लक्ष वेधले.

कोण पळवतंय हक्काचं पाणी?

राज्यात पाण्याच्या नियोजनाचा बोजवारा उलटला आहे. बळी तो कानपिळी, कालव्यात दादागिरी करून पाणी वळवण्याचे काम सुरू आहे. नेत्यांसमोर अधिकारी हतबल झाले आहेत. जनतेला पाणी मिळेनासं झालं आहे. असंच जर राहिलं तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. फेब्रुवारी महिन्यात धरणं कोरडी होतील. महाराष्ट्रात अवघड परिस्थिती आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सर्व बरोबर आहोत. पण सरकारची भूमिकाच समजत नाही.

रिसायकलिंगचा दावा करत आहेत. पण नाशिकला पाणी प्रक्रिया प्रकल्प किती आहेत, ते तर आधी सांगा असा सवाल राष्ट्रवादीचे खासदार जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. आमच्याकडे बहुमत आहे अशा तोऱ्यात सरकार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. दादागिरी करून, गुंडगिरी करून काही गावगुंड, काही आमदार हे त्यांच्या गावात, मतदारसंघात पाणी वळवत असतील तर मोठं कठीण आहे. मग महाराष्ट्राचं हित कोण बघणार? जनतेचा उद्रेक होईल. परिस्थिती हाताबाहेर जाईल असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत

शेतकरी आत्महत्या हा गंभीर विषय आहे. सरकारी उपाय योजनाच त्यांना आधार देऊ शकतात. शेतकऱ्यांना तुटुपुंजी 5 हजारांची मदत दिली. त्या पाच हजार रुपयांनी काय होणार आहे? सरकारने गांभीर्याने विचार करायला पाहिजे होता. सकारात्मक भूमिका घ्यायला हवी होती. सर्वपक्षीय बैठक बोलावायला पाहिजे होती. पण काहीही न करता सरकारने त्यांचं घोडं पुढं दामटलं. हम करे सो कायदा म्हटलं की मग अंगलट येणारच, असे आव्हाड म्हणाले. शेतकरी आत्महत्या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. जे काही घडतंय ते काही महाराष्ट्राला शोभणारं नाही, असे आव्हाड म्हणाले.

तर नितेश राणे यांना शाही स्नान कुठे आणि कधी सुरू झाले याविषयीचे पुस्तक पाठवतो असा टोला आव्हाड यांनी लगावला. राणे यांना भारताचा इतिहास माहिती नाही. नद्या माहिती नाहीत. त्या कुठून उगम पावतात हे माहिती नाही. कुंभमेळा कुठे आणि किती वर्षांनी होतो हे माहिती नाही. राज्य इतक्या अवघड स्थितीतून जात असताना तुम्हाला जाती पातीचं राजकारण सुचतं? तुम्ही महाराष्ट्र हिताचं काम करता की द्वेषाचं काम करता? असा सवाल आव्हाडांनी राणे यांना विचारला. कायदा आणि सुव्यवस्था अरबी समुद्रात दूरवर कुठेतरी फेकल्या गेलेत अशी जहरी टीका ही आव्हाडांनी केली. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Follow Us
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....