

रश्मिका तिच्या चित्रपटांमधून तगडी कमाई करते. दरवर्षी ती जवळपास 8 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करते. एका चित्रपटासाठी ती तीन ते चार कोटी रुपयांचं मानधन घेते. अवघ्या 27 व्या वर्षी तिची एकूण 65 कोटी रुपयांची संपत्ती आहे. चित्रपटांशिवाय ती जाहिराती आणि मॉडेलिंगमधूनही पैसा कमावते.

कमाईच्या आणि संपत्तीच्या बाबतीत रश्मिकाने बॉलिवूडच्या दोन स्टारकिड्सना मागे टाकलं आहे. सारा अली खान आणि अनन्या पांडे हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले स्टारकिड्स असेल तरी संपत्तीच्या बाबतीत ते रश्मिकाच्या मागेच आहेत.

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानची एकूण संपत्ती जवळपास 30 कोटी रुपयांच्या घरात आहे. दर महिन्याला ती 50 लाख रुपयांपर्यंत कमाई करते. साराने नुकतंच स्वत:चं घर खरेदी केलं आहे.

दुसरीकडे अभिनेते चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेची संपत्ती 35 कोटी रुपये इतकी आहे. अनन्याने आतापर्यंत पाच चित्रपटांमध्ये काम केलंय. सोशल मीडियावर ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.