
दक्षिण चित्रपटसृष्टीप्रमाणेच बॉलिवूड गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना गेल्या काही दिवसांपासून विजय देवरकोंडासोबतच्या तिच्या साखरपुड्याच्या अफवांमुळे चर्चेत आहे. मात्र रिपोर्ट्सनुसार, आता हे जोडपं त्यांचं नातं आणखी पुढे नेणार आहेत. सीक्रेट साखरपुड्यानंतर आता रश्मिका आणि विजय लवकरत सप्तपदी घेणार आहेत. दोघेही येत्या काळात विवाह करणार असल्याची माहिती समोर येत असून त्यांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे.
या दिवशी रश्मिका-विजय अडकणार लग्नबंधनात
पिंकव्हिलाच्या एका रिपोर्टनुसार, अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना पुढल्या वर्षी म्हणजेच, 26 फेब्रुवारी 2026 रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. राजस्थानातील उदयपूर येथील एका राजवाड्यात त्यांचा भव्य विवाह सोहळा पार पडणार आहे. या जोडप्याने 3 ऑक्टोबर 2025 रोजी हैदराबादमध्ये गुपचूप साखरपुडाही केला होता. पण त्या दोघांपैकी कोणीच यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अशी सुरू झाली लव्हस्टोरी
विजय देवेराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या “गीता गोविंदम” चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या सेटवरच त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. त्यानंतर हे जोडपे “डिअर कॉम्रेड” (2019) मध्ये न्हा एकत्र दिसलें. त्यांच्या केमिस्ट्रीने पडद्यावर आग लावली. त्यांच्या जोडीने सर्वांनाच भुरळ घातली. त्यानंतर त्या दोघांच्या डेटिंगच्या अफवा पसरू लागल्या. त्यांना अनेक वेळा एकत्र सुट्टी एन्जॉय करताना तसेच रेस्टॉरंटमध्हीये एकत्र पाहिलं गेलं. अलिकडेच एका मुलाखतीत रश्मिकाने त्यांच्या लग्नाचा खुलासा केला आणि म्हटलं की, “सर्वांना याबद्दल माहिती आहे…” तिच्या या विधानाचीही खूप चर्चा झाली.
2 वर्षांत 4 सुपरस्टार्सची बनली पत्नी, छापले 3000 कोटी, कोण आहे ती अभिनेत्री ?
रश्मिकाचं काम
रश्मिकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती नुकतीच मॅडॉकच्या हॉरर कॉमेडी फिल्म ‘थामा’मध्ये दिसली. यामध्ये तिच्यासोबत आयुष्मान खुराना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी दे दोन स्टार्सही प्रमुख भूमिकेत होते. आता रश्मिकाचा ‘द गर्लफ्रेंड’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे. 7 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.