AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 वर्षांत 4 सुपरस्टार्सची बनली पत्नी, छापले 3000 कोटी, कोण आहे ती अभिनेत्री ?

Indian Actress : प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्री त्यांच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. कधी एखाी अभिनेत्री, एखाद्याच्या बहिणीची, प्रेयसीची किंवा पत्नीची भूमिका साकारत असते... पण कधीकधी, अशीच भूमिका एखाद्याचे नशीब उजळवू शकते. आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जी गेल्या 2 वर्षांत तब्बल 4 सुपरस्टार्सची पत्नी बनली आहे. तिच्या 3 चित्रपटांनी 3 हजार कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला. पण..

2 वर्षांत 4 सुपरस्टार्सची बनली पत्नी, छापले 3000 कोटी, कोण आहे ती अभिनेत्री ?
कोण आहे ती अभिनेत्री ?
| Updated on: Oct 09, 2025 | 10:59 AM
Share

एका अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला त्यांच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या शैलीबाहेर जाऊन काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दक्षिण भारतीय आणि आता बॉलिवूडमधील चित्रपट निर्मात्यांचीही आवडती बनली आहे. सलग दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांसह, तिने गेल्या दोन वर्षांत 3 हजार कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तिच्या चित्रपटांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

ही अभिनेत्री फक्त 29 वर्षांची आहे, पण तिने अनेक टॉप अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले आहे. सध्या तिच्याकडे अनेक मोठे चित्रपट आहेत. तिचा एक चित्रपट या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे आणि त्यासाठी तिने एका मोठ्या हॉरर-कॉमेडी यूनिवर्सशी हात मिळवणी केली आहे. या अभिनेत्रीने 2018 मध्ये तेलुगू भाषेत पदार्पण केले. पण 2021 साली तिच्यासाठी सर्व काही बदललं.

पुष्पाने बदललं नशीब

2021 साली जेव्हा अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा श्रीवल्ली प्रसिद्ध झाली. रश्मिका मंदानाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. त्यानंतर, तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे मोठ्या प्रमाणात उघडले. पण तिलं खरं यश तेव्हा मिालं जेव्हा ती 2023 साली आलेल्या “ॲनिमल” चित्रपटात रणबीर कपूरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली. या चित्रपटाने जगभरात 915 कोटींपेक्षा अधिक कमाई केली.

त्यानंतर ‘पुष्पा’चा सिक्वेल आला. अल्लू अर्जुन आणि श्रीवल्ली पुन्हा एकदा एकत्र आले. “पुष्पा: द रुल” डिसेंबर 2024 मध्ये प्रदर्शित झाला आणि तो एक खळबळजनक चित्रपट ठरला. त्याला जगभरातून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले. या चित्रपटाने विशेषतः जगभरात 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती.

छावाच्या घोडदौडीचा फायदा

रश्मिका मंदानाचा प्रवास एवढ्यातच थांबला नाही. या वर्षाच्या सुरुवातीला विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला”छावा” प्रदर्शित झाला. तो चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती, पण मोठ्या पडद्यावर आणि बॉक्स ऑफीसवरही त्याने धूमाकळू माजवत मोठी कमाई केली. याची कोणीच कल्पना केली नव्हती. थोड्याच वेळात, त्याने जगभरात 8अब्ज रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटात रश्मिकाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका केली होती.

खरं तर, ‘पुष्पा 2’, ‘छावा’ आणि ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटांचे कलेक्शन एकत्र केले तर एकूण कलेक्शन 3500 कोटी होते. रश्मिका मंदान्नाच्या या तीन चित्रपटांनी एकत्रितपणे कमाई केली आहे. पण 2025 मध्ये तिला जितका ांद मिळाल, तेवढीच निराशा हाथी आली जेव्हा एका मोठ्या सुपरस्टारने तिच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची मालिका मोडली.

खरंतर, सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट या वर्षी ईदला प्रदर्शित झाला. तो मोठ्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. पण हा चित्रपट बिलकूल चालला नाही, लोकांनी तो थेट नाकारला. सलमान खानचे लाखोंचे नुकसान झाले. पण रश्मिकाला सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागले. कारण तिची हिट चित्रपटांची मालिका यामुळे थांबली आणि फ्लॉपचा सामना करावा लागला.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.