Ratris Khel Chale 3 | अण्णा नाईकांच्या पाप…शाप… आणि उ:शापाचा खेळ! अशी रंगणार मालिकेची कथा…

| Updated on: Mar 23, 2021 | 1:17 PM

‘रात्रीस खेळ चाले 2’मध्ये अण्णा, माई, शेवंता या पात्रांनी अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. आता ‘रात्रीस खेळ चाले 3’ मध्ये (Ratris Khel Chale 3) काय असणार याचीच उत्सुकता सर्वांना आहे.

Ratris Khel Chale 3 | अण्णा नाईकांच्या पाप...शाप... आणि उ:शापाचा खेळ! अशी रंगणार मालिकेची कथा...
रात्रीस खेळ चाले 3
Follow us on

मुंबई : ‘अण्णा नाईक’ परत येणार, याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु होती. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांमध्येच अण्णा नाईकांची क्रेझ होती. प्रत्येकजण अण्णांची आतुरतेने वाट बघत होता. अखेर काल (22 मार्च) अण्णा नाईक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पहिल्याच भागात अण्णांचा दरारा पुन्हा अनुभवायला मिळाला आहे. ‘रात्रीस खेळ चाले 2’मध्ये अण्णा, माई, शेवंता या पात्रांनी अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. आता ‘रात्रीस खेळ चाले 3’ मध्ये (Ratris Khel Chale 3) काय असणार याचीच उत्सुकता सर्वांना आहे. या मालिकेचे लेखक राजेंद्र घाग यांच्या नजरेतून ‘रात्रीस खेळ चाले 3’ची कथा नेमकी काय असणार  ते जाणून घेऊया…(Ratris Khel Chale 3 storyline what will happen next)

लेखक म्हणतात…

प्रत्येक घराण्याला एक इतिहास असतो. कोणी तो शोधतो तर कोणी शोधत नाही. पण इतिहास हा असतोच. त्या त्या घराण्याचा मूळ पुरुष कोणीतरी असतो आणि त्याची वंशवेल पुढे नांदताना दिसते, ज्याला आपण पीढी म्हणतो. अशा अनेक पिढ्या त्या घराण्याच्या झालेल्या असतात. अशा एखाद्या पीढीत एखादा वंशज क्रूरकर्मा निपजतो. तो दुराचारी होऊन अराजकता माजवतो. पूर्वजांनी नेमून दिलेले कुळाचार तो पायदळी तुडवतो. स्वार्थासाठी तो पुण्याची कास सोडून पाप प्रवृत्त होतो. त्यामुळे त्याच्या हातून खून,व्यभिचार, व्यसन असली पापं घडत जातात. पण त्याचे भोग त्याच्या सर्व कुटुंबाला भोगावे लागतात.

पापं आणि शाप या एकाच नाण्याच्या दोन बाजू!

कारण  ज्यांच्यावर अन्याय झालेला असतो, त्यांचे असंतुष्ट आत्मे त्या पापी माणसाबरोबर त्याच्या घराण्याला देखील शाप देत असतात. म्हणजेच पापं आणि शाप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका पिढीने केलेलं पाप दुसऱ्या पिढीला शाप म्हणून भोगावं लागतं. परंतु पूर्वजांच्या, पूर्व पुण्याईने घराण्यातल्या सत्शील माणसा करवी त्या शापित घराण्याला उषा:पही मिळत असतो. पण त्या उ:शापासाठी घराण्यातल्या सच्छील व्यक्तीला खूप यातना सोसाव्या लागतात. त्याग करावे लागतात आणि त्यानंतरच ते घराणं शाप मुक्त होतं. म्हणजेच त्या घराण्याचा पाप…शाप… आणि उ:शाप असा एक प्रवास सुरू होतो (Ratris Khel Chale 3 storyline what will happen next).

अशी रंगणार नाईक वाड्याची कथा…

अशाच एका नाईक घराण्याची “रात्रीस खेळ चाले” ही कथा. अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले. अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची वाताहात लागली. अतृप्त आत्म्यानी नाईक वाड्याचा ताबा घेतला. एक नांदतं घर बघता बघता रसातळाला गेलं. पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको, इंदू उर्फ माई नाईक घराण्याच्या मूळ पुरुषावर आणि कुलदैवतेवर भार टाकून सगळ्या स़कटांशी शेवटपर्यंत लढते. आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. एक अशिक्षित स्त्रीसुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते. त्याची ही एक रंजक कथा असणार आहे. नाईक घराण्याचं पाप…शाप… आणि उ:शाप यामधून झालेलं संक्रमण म्हणजेच ‘रात्रीस खेळ चाले 3’ असणार आहे.

(Ratris Khel Chale 3 storyline what will happen next)

हेही वाचा :

Birthday Special | ‘थलायवी’ बनण्यासाठी कंगनाने वाढवलेलं तब्बल 20 किलो वजन, पाहा तिचा नवा लूक