‘नाईकांच्या वाड्या’तून पाटणकरांची थेट बॉलिवूडमध्ये उडी, ‘नेलपॉलिश’ या हिंदी चित्रपटात झळकणार!

Harshada Bhirvandekar

|

Updated on: Dec 16, 2020 | 7:09 PM

पाटणकरांची ही भूमिका साकारणारा अभिनेता अधिश पायगुडे आता ‘नेलपॉलिश’ या हिंदी चित्रपटातून बॉलीवूड मध्ये दमदार पदार्पण करणार आहे.

‘नाईकांच्या वाड्या’तून पाटणकरांची थेट बॉलिवूडमध्ये उडी, ‘नेलपॉलिश’ या हिंदी चित्रपटात झळकणार!

मुंबई : ‘रात्रीस खेळ चाले’ या गाजलेल्या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षक पसंतीस उतरल्या होत्या. ‘अण्णा नाईक’, ‘शेवंता’, ‘पांडू’ या सर्व व्यक्तिरेखांसोबत ‘कमलाकर पाटणकर’ ही व्यक्तिरेखासुद्धा चांगलीच लक्षवेधी ठरली. पाटणकरांची ही भूमिका साकारणारा अभिनेता अधिश पायगुडे (Adhish Paigude) आता ‘नेलपॉलिश’ या हिंदी चित्रपटातून बॉलीवूड मध्ये दमदार पदार्पण करणार आहे. अभिनेता अर्जुन रामपाल यांच्यासोबत अधिश या चित्रपटात झळकणार आहे. नवीन वर्षाच्या शुक्रवारी म्हणजेच 1 जानेवारीला ‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट झळकणार आहे (Ratris Khel Chale Kamlakar Patankar Fame actor Adhish Paigude in Nail polish).

‘नेलपॉलिश’ या चित्रपटाबद्दल आणि या चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अधिश सांगतात की, ‘कायद्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातून ‘शेड्स ऑफ लॉ’ म्हणजेच कायद्याचे वेगवेगळे कंगोरे प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. या चित्रपटात काम करणं हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता. अर्जुन रामपाल, मानव कौल, आनंद तिवारी, रजत कपूर यासारख्या कलाकारांबरोबर काम करताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या’.

मनोरंजन विश्वातल्या प्रत्येक क्षेत्रात मुसाफिरी…

कॉलेजमध्ये असल्यापासून ‘पुरुषोत्तम’, ‘फिरोदिया’ करंडक’ सारखे अनेक व्यासपीठ गाजवणाऱ्या अधिश यांनी आपली कलेची आवड जोपासण्यासाठी इंजिनियरची नोकरी सोडून कलेसाठी पूर्णवेळ देण्याचे ठरवले. त्यानंतर विविध नाटकं, मालिका, चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘राज्य नाटय’ स्पर्धेत प्रथम आलेलं व अभिनयाचं विशेष पारितोषिक मिळालेलं ‘एक रिकामी बाजू’, ‘बेईमान’, ‘मी रेवती देशपांडे, ‘आषाढातील एक दिवस’, ‘हॅम्लेट’ तसेच स्वत: लेखन आणि अभिनय केलेलं ‘कसाब आणि मी,’ ‘संगीत हमीदाबाईची कोठी’, ’धुवान’, ‘अपराधी सुगंध’, ‘प्राईस टॅग’ यांसारख्या नाटकांसोबत ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘एक हजाराची नोट’, ‘तुंबाड’, ‘मेकअप’ चित्रपटांमध्ये सुद्धा अधिश यांनी अभिनय केला आहे (Ratris Khel Chale Kamlakar Patankar Fame actor Adhish Paigude in Nail polish).

‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘गर्ल्स हॉस्टेल’ या मालिकांमध्ये झळकलेल्या अधिश यांनी ‘स्त्रीलिंगी –पुल्लिंगी’ या वेबसीरीज मध्येही आपल्या अभिनयाचे रंग भरले आहेत. लेखन, अभिनय, दिग्दर्शन अशा क्षेत्रांत मुशाफिरी करत कलेचा दमदार ठसा उमटविणारे अधिश आता हिंदीत आपल्या दमदार अभिनयाची वेगळी छाप नक्कीच पडतील.

(Ratris Khel Chale Kamlakar Patankar Fame actor Adhish Paigude in Nail polish)

संबंधित बातम्या : 

Video : उषा नाडकर्णी यांना ऑनस्क्रीन मुलाची आठवण, ‘मानव’च्या आठवणीत कोसळलं रडू!

Video: अंकिता लोखंडेचा हॉट अंदाज, मात्र सुशांतच्या चाहत्यांनी केलं ट्रोल

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI