Video : उषा नाडकर्णी यांना ऑनस्क्रीन मुलाची आठवण, ‘मानव’च्या आठवणीत कोसळलं रडू!

अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना सुशांतच्या आठवणीत रडू कोसळलं आहे.(Usha Nadkarni remembers Sushant Singh Rajput, cries in memory of onscreen son 'Manav'!)

  • Updated On - 2:23 pm, Wed, 16 December 20
Video : उषा नाडकर्णी यांना ऑनस्क्रीन मुलाची आठवण, ‘मानव’च्या आठवणीत कोसळलं रडू!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता जवळजवळ 6 महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अजूनही चाहते, कुटुंब आणि मित्रांच्या हृदयात त्याच्या आठवणी ताज्या आहेत. सुशांतला खरी ओळख मिळाली ती म्हणजे झी टीव्हीवरील मालिका ‘पवित्र रिश्ता’मधून. या मालिकेच्या माध्यमातून सुशांत घराघरात पोहोचला. मालिकेत त्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना सुशांतच्या आठवणीत रडू कोसळलं आहे. त्यांना त्यांच्या लाडक्या ‘मानव’ची आठवण आली आणि त्यांना स्टेजवरच त्यांना रडू कोसळलं.

नुकताच ‘झी रिश्ते’ अवॉर्ड्स सोहळा पार पडला. यावेळी उषा नाडकर्णी या सुशांतबद्दल काही शब्द बोलल्या. सुशांतबद्दल बोलतांना त्यांना अचानक रडू कोसळलं. ‘ऑनस्क्रीन माझा मानव शांत होता मात्र ऑफस्क्रीन तो प्रचंड नटखट होता. आजही माझा मानव माझ्या हृदयात आहे’, असं त्यांनी सांगितलं. या अवॉर्ड शोमध्ये अंकितानंसुद्धा तिच्या डान्सद्वारे सुशांतला श्रद्धांजली दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by sushankita (@guggu_minty2119)


उषा नाडकर्णी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सुशांतच्या एका फॅनपेजवरुन शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ बघून अनेकांना रडू कोसळतंय.

सुशांतनं एकता कपूरच्या ‘किस देश में होगा मेरे दिल’ या मालिकेतून पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो ‘पवित्र रिश्ता’या मालिकेत झळकला. या व्यतिरिक्त तो अनेक डान्स शोमध्ये दिसला. तर, सुशांत बॉलिवूडमधील ‘छिछोरे’, ‘धोनी’,’पीके’,’राबता’ अशा अनेक चित्रपटांमध्येसुद्धा झळकला. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा ‘दिल बेचारा’हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

संबंधित बातम्या

Video: अंकिता लोखंडेचा हॉट अंदाज, मात्र सुशांतच्या चाहत्यांनी केलं ट्रोल

Bollywood | फुटबॉल मॅच पाहण्यासाठी रणबीर-आलिया एकत्र, फोटो व्हायरल

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI