
बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री जिने तिच्या अभिनयाने आणि तिच्या सौंदर्याने नेहमीच सर्वांना घायाळ केलं आहे. आजही या वयात रेखा यांच्या सौंदर्यात काहीही कमतरता दिसून येत नाही. आजही त्यांची अदाकारी सर्वांना भुरळ घालणारीच आहे.
बोल्ड आणि इंटिमेट सीन्सची चर्चा
रेखा यांनी जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यांना जसजशी प्रसिद्धी मिळू लागली त्यापद्धतीने त्यांनी त्यांच्या अभिनयाबाबत,भूमिकांबाबत अनेक प्रयोगही केले. रेखा यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. रेखा त्यांच्या काळातही तेवढ्याच चर्चेत होत्या. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही आणि चित्रपटांमध्ये साकारणाऱ्या भूमिकांमुळेही. भूमिकांबाबत प्रयोग करत असताना रेखा यांनी फार धाडसी निर्णय घेतले होते. रेखा यांनी अनेक चित्रपटांमध्ये खूप बोल्ड आणि इंटिमेट सीन्सही दिले आहेत. त्याकाळी हे कोणत्याही धाडसापेक्षा कमी नव्हतं.
रेखा यांचा अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत एक अतिशय बोल्ड आणि इंटिमेट सीन
रेखा यांचे नाव अनेक लोकांशी जोडले गेले आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या अफेअरची खूप चर्चा झाली. पण सोबतच त्यांनी चित्रपटांमध्ये दिलेल्या बोल्ड सीन्ससाठीही प्रचंड चर्चा झाली होती. अशाच एका चित्रपटात, रेखा यांनी अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत एक अतिशय बोल्ड आणि इंटिमेट सीन दिला होता. चित्रपटात दोघांची केमिस्ट्री खूप छान होती. पण हा सीन पाहून प्रेक्षक मात्र चांगलेच हैराण झाले होते. कारण 70s,80sच्या काळात अशाप्रकारचे बेधडक इंटिमेट सीन देणं पचवणे फारच कठीण होतं.
चित्रपटातील रेखा आणि जितेंद्रचा हा सीन खूप चर्चेत आला होता
रेखा आणि जितेंद्र यांनी केलेला बोल्ड सीन हा एका बाथटबमधला होता. बाथटबमधला या दोघांचा हा रोमान्स पाहूनलोक थक्क झाले. या दृश्याने सिनेमागृहात एकच खळबळ उडाली होती. हा सीन दृश्य 1989 च्या ‘सौतन की बेटी’ चित्रपटातील आहे. या चित्रपटात जितेंद्र आणि रेखा यांच्याशिवाय अभिनेत्री जया प्रदा देखील मुख्य भूमिकेत होत्या. चित्रपटातील रेखा आणि जितेंद्रचा हा सीन खूप चर्चेत आला होता.
चित्रपट त्यावेळचा सुपरहीट चित्रपट ठरला
चित्रपटात दाखवण्यात आलेल्या या सीनमध्ये रेखा आणि जितेंद्र यांनी खूप नशा केलेली दिसत आहे. तसेच एकमेकांशी रोमान्स करताना दिसत आहेत. हा चित्रपट त्यावेळचा सुपरहीट चित्रपट ठरला. या चित्रपटाने खूप कमाई केली होती. या चित्रपटाची कथा लोकांना खूप आवडली. मात्र या चित्रपटातील बाथटब सीन सर्वाधिक चर्चेत राहिला. थिएटरमध्ये चित्रपट पाहताना जेव्हा हा सीन यायचा तेव्हा लोक थक्क व्हायचे. या सीनवरून प्रेक्षकांनी गोंधळही घातला होता. पण चित्रपटाची कथा चांगली असल्याने प्रेक्षकांनी फार तीव्र प्रतिक्रिया दिल्या नाहीत.