रेखा यांचं पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होतं अफेअर, लग्नासाठी अभिनेत्रीच्या आईनंही दिलेली परवानगी; पण…
Rekha Affair With Pakistani Cricketer : रेखा त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबत च वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होत्या. त्यांचं नाव पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत जोडलं गेलेलं.

रेखा या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि आजही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. रेखा त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असायच्या. रेखा आणि एका पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या अफेअरच्या चर्चा होत्या.
१९८० मध्ये रेखा आणि इम्रान खान यांच्या अफेअरच्या अफवा पसरल्या होत्या. ते अनेकदा कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते.
जेव्हा रेखा यांच्या आई, पुष्पावल्ली यांनी इम्रान खान यांच्याबद्दल आपली आवड व्यक्त केली, तेव्हा रेखा आणि इम्रान खान यांच्या नात्याच्या अफवा अधिकच बळावल्या. इम्रान तिच्या मुलीसाठी योग्य जोडीदार ठरतील की नाही हे ठरवण्यासाठी त्या दिल्लीला गेल्या आणि त्यांनी एका ज्योतिषाचा सल्ला घेतला. इम्रान रेखा यांना भेटण्यासाठी भारतात आलेले आणि ते दोघं मुंबईत भेटले व त्यांनी एकत्र वेळ घालवला.
इम्रान आणि रेखा समुद्रकिनाऱ्यावर आणि नाईटक्लबमध्येही एकत्र दिसले होते. व्हायरल झालेल्या जुन्या लेखात रेखा यांच्यासोबतच्या नात्याबद्दल इम्रान खान यांचं विधानही छापून आलेलं. त्यात इम्रान म्हणाले होते, 'मी काही काळ रेखा यांच्या सहवासाचा आनंद घेतला आणि मग आम्ही आपापल्या मार्गी लागलो. मी एका चित्रपट अभिनेत्रीशी लग्न करण्याची कल्पनाही करू शकत नाही.'
इम्रान खान यांचं नाव चित्रपट अभिनेत्री शबाना आझमी आणि झीनत अमान यांच्याशीही जोडलं गेलं होतं. क्रिकेटला रामराम केल्यानंतर इम्रान यांनी राजकारणात प्रवेश केला आणि २०१८ मध्ये त्यांच्या 'तेहरीक-ए-इन्साफ' पक्षाच्या विजयानंतर ते पाकिस्तानचे पंतप्रधान बनले.