Rhea Chakraborty | सीबीआयबद्दल प्रश्न विचारताच रिया चक्रवर्तीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी; व्हिडीओ व्हायरल

तब्बल दोन वर्षांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती 'रोडीज' या शोद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या शोमध्ये गौतम गुलाटीने एका स्पर्धकाला सीबीआयचा फुल फॉर्म विचारताच रिया चक्रवर्तीची प्रतिक्रिया पाहण्याजोगी होती.

Rhea Chakraborty | सीबीआयबद्दल प्रश्न विचारताच रिया चक्रवर्तीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी; व्हिडीओ व्हायरल
Rhea Chakraborty
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 07, 2025 | 2:14 PM

मुंबई, 17 जुलै 2023 : अभिनेत्री रिया चक्रवर्तीने जवळपास तीन वर्षांनंतर ‘एमटीव्ही रोडीज 19’ या रिॲलिटी शोमधून पुनरागमन केलं. अभिनेता सुशांत सिंह राजूपतच्या निधनानंतर रिया कायदेशीर अडचणीत सापडली होती. ड्रग्ज प्रकरणात तिला एनसीबीने अटकही केली होती. जवळपास महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर रियाची जामिनावर सुटका झाली. या सर्व प्रकरणानंतर ती दोन वर्षे माध्यमांपासून दूरच होती. आता या शोद्वारे रिया पुन्हा एकदा इंडस्ट्रीत सक्रिय झाली आहे. एमटीव्ही रोडीजमध्ये ती गँग लीडर म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच शोमधील तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

‘एमटीव्ही रोडीज 19’च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये गौतम गुलाटीने एका स्पर्धकाला सीबीआयचा फुल फॉर्म विचारला. हा प्रश्न ऐकताच रिया चक्रवर्ती तिच्या खुर्चीवरून पटकन उठली आणि हात वर करत म्हणाली “मला माहीत आहे.” रियाची प्रतिक्रिया पाहून स्पर्धकसुद्धा चकीत होते. ज्या स्पर्धकाला फुल फॉर्म विचारण्यात आला, तिने चुकीचं उत्तर दिल्यानंतर रियाने योग्य उत्तर सांगितलं. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन असा तिने सीबीआयचा फुल फॉर्म सांगितला. तिचा हाच व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

रियाचा व्हिडीओ चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे सुशांतच्या निधनाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. 14 जून 2020 रोजी सुशांत मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या निधनानंतर रियावर बरेच आरोप झाले होते. तिला मीडिया ट्रायलचा सामना करावा लागला होता. रियावर सुशांतला ड्रग्ज पुरविल्याचा, मनी लाँड्रिंग आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप होता. अटकेनंतर जवळपास महिनाभर ती तुरुंगात होती.

रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत हे एकमेकांना डेट करत होते. सुशांतच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर फोटो पोस्ट तिने रिलेशनशिप जाहीर केलं होतं. हे दोघं 2020 च्या अखेरीस लग्न करणार होते, अशीही चर्चा होती. मात्र त्याच वर्षी जून महिन्यात सुशांत मृतावस्थेत आढळला होता.