AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अल्फा’च्या सेटवर आलियाचं वाजलं? आदित्य चोप्राला करावा लागला हस्तक्षेप, पिक्चर रिलीज होणार की नाही ?

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्स "अल्फा" च्या सेटवर आलिया भट्टचं सहकलाकाराशी जोरदार वाजलं. हा वाद इतका वाढला की चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी निर्माता आदित्य चोप्रा यांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र आता अल्फाच्या रिलीजवर संकट घोंगावू लागलं आहे.

'अल्फा'च्या सेटवर आलियाचं वाजलं? आदित्य चोप्राला करावा लागला हस्तक्षेप, पिक्चर रिलीज होणार की नाही ?
आलिया भट्ट - अल्फा
| Updated on: Feb 13, 2026 | 1:54 PM
Share

यशराज फिल्म्सच्या “अल्फा” चित्रपटाची खूप चर्चा होती. मात्र सध्या वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. “अल्फा” च्या सेटवर आलिया भट्ट आणि बॉबी देओल यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या ऑनलाइन समोर येत आहेत. यामुळे चाहते हैराण झालेत. मात्र कलाकार किंवा निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत पुष्टीकरण झालेले नाही, असे असले तरी, क्रिएटिव मतभेदांमुळे तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे. एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, सेटवर आलिया भट्ट आणि बॉबी देओलमध्ये तणाव निर्माण झाला आहे. बॉबीच्या दृश्यामध्ये आलिया सारख्या सूचना करत असते, त्यामुळे हे मतभेद निर्माण झाले.

त्यानंतर बॉबी देओलने आलिया भट्टच्या सूचनांवर आक्षेप घेतला, ज्यामुळे सेटवर तणाव निर्माण झाला. भांडण टोकाला पोहोचल्यामुळे, परिस्थिती इतकी बिकट झाली की शूटिंग सुरळीत सुरू ठेवण्यासाठी निर्माता आदित्य चोप्रा यांना हस्तक्षेप करावा लागला. चित्रपटाबद्दल वाढत्या चर्चांनंतर आता लेटेस्ट रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की हा चित्रट थिएटरमध्ये रिलीज होणार नाहीये.

डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाशी जवळच्या ऐका सूत्राने माहिती दिली की, “आदित्य चोप्राला अशी आशा होती की ‘मर्दानी’ मधून फीमेल-हीरो जॉनरला चालना मिळेल, त्यामुळे ‘अल्फा’ हा चित्रपट आलियाला हिरो दाखवून, तसचा चित्रपट म्हणून सादर करता येईल. पण ‘मर्दानी ३’ च्या खराब कामगिरीमुळे आणि स्पाय युनिव्हर्सच्या ‘वॉर २’ मधील अपयशानंतर, ‘अल्फा’ हा चित्रपट आता यशराजचा रखडलेला प्रकल्प दिसत आहे.

ओटीटीवर रिलीज होणार अल्फा? आलिया भट्ट नाराज

रिपोर्ट्सनुसार, “अल्फा” चित्रपट आता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो, परंतु आलिया भट्टचा याला विरोध आहे. पण कोणतीही पुष्टी झालेली नाही. गेल्या वर्षी, आलिया भट्ट जेद्दा येथील रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती, जिथे तिने तिच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगितलं होतं. “‘अल्फा’ हा YRF विश्वातील पहिला फीमेल-लीड अॅक्शन चित्रपट आहे, म्हणून तो देखील एक धोका आहे, कारण ऐतिहासिकदृष्ट्या दिसलं की असे चित्रपट पुरुष-लीड चित्रपटांइतके चांगले प्रदर्शन करत नाहीत.” त्यामुळे याच्या भविष्याबद्दल साशंकता आहे.

खरंतर अल्फा हा आधी ख्रिसमस म्हणजेच डिसेंबर 2025मध्ये प्रदर्शित होणार होता पण आता तो 17 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होईल. प्रेक्षकांसाठी अल्फाचे व्हीएफएक्स परिपूर्ण करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक आहे असं सांगत कंपनीने याची पुष्टी केली होती. आता या चित्रटाला कसा प्रतिसाद मिळोत, तो कुठे रिलीज होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला