AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर 2’च्या यशावर रितेश देशमुखची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला “तुम्ही हे गृहित धरू नका की..”

अभिनेता रितेश देशमुखने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' या दोन्ही चित्रपटांच्या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली. हिंदी चित्रपटसृष्टीला एका साच्यात ठेवता येणार नाही, असं त्यान म्हटलंय.

'धुरंधर 2'च्या यशावर रितेश देशमुखची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला तुम्ही हे गृहित धरू नका की..
Riteish Deshmukh and Ranveer SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 26, 2026 | 9:39 AM
Share

अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा त्यानेच केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत रितेश पहिल्यांदाच ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांच्या यशाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. हिंदी चित्रपटसृष्टीला एकाच साच्यात बंदिस्त ठेवता येणार नाही, असं मत त्याने यावेळी मांडलं. इतकंच नाही तर चित्रपट निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडींबद्दल जागरूक राहिलं पाहिजे आणि फक्त एकाच प्रकारची कथाकथनाची शैली यशस्वी होईल, असं गृहित धरू नये, असंही त्याने म्हटलंय. जेव्हा कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असते, तेव्हा भारतीय प्रेक्षक विविध प्रकारच्या चित्रपटांसाठी नेहमीच खुला आणि व्यापक दृष्टीकोन ठेवतो, असं वक्तव्य रितेशने केलं आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या या मुलाखतीत आदित्य धरच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या दोन्ही चित्रपटांच्या यशावर प्रतिक्रिया देताना रितेश म्हणाला, “मला असं वाटतं की आपण आपल्या आजूबाजूला होणाऱ्या बदलांविषयी खूप जागरुक असायला हवं. आपण या बदलांकडे डोळेझाक करू शकत नाही. धुरंधर किंवा धुरंधर 2 यांसारखी अप्रतिम गोष्ट, ज्यात एक वेगळं कथानक, कथा सांगण्याची वेगळी शैली, वेगळा दृष्टीकोन असतो, तेव्हा ती गोष्ट खरोखर यशस्वी ठरते. त्यामुळे अशा गोष्टींचं नेहमीच स्वागत आहे. तुम्हाला त्याबद्दल एक रोमांचकारी भावना वाटते.”

“एका फॉरमॅटच्या चित्रपटांच्या यशामुळे इंडस्ट्रीने इतर कथांकडे दुर्लक्ष करू नये. पण मला असं वाटतं की आपले प्रेक्षक खूप सुजाण आहेत. एखादी कथा खरंच चांगली असेल तर ते नक्कीच थिएटरमध्ये येऊन पाहतात आणि त्याचा आनंदही घेतात. फक्त याच प्रकारच्या कथा किंवा याच प्रकारच्या गोष्टी यशस्वी होतील असा विचार करणं खूप मर्यादेत राहिल्यासारखं होईल. कारण जेव्हा धुरंधर आला, तेव्हा तो वेगळा चित्रपट होता, जेव्हा सैय्यारा आला, तेव्हा तो एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट होता. त्यामुळे जर तुम्ही खरोखर यशस्वी झालेल्या चित्रपटांकडे पाहिलं तर, या सर्वांनी स्वत:साठी मापदंड निश्चित केले आहेत. यातून हेच सिद्ध होतं की आपण व्यापक दृष्टीकोन ठेवावा”, असं मत रितेशने मांडलं आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप