
बॉलिवूडसोबतच मराठी चित्रपटांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे रितेश देसमुख. त्यात बिग बॉस मराठीच्या होस्टींगनंतर तर रितेशला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं. रितेश आणि जिनिलिया ही जोडी सर्व महाराष्ट्राला आपली वाटते. त्यामुळे या जोडीची चर्चा ही कायमच पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या या लाडक्या जोडीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नुकतंच रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी मुलांसह शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं.
रितेश आणि जिनिलिया मुलांसह साईचरणी
रितेश आणि जिनिलिया ही जोडी कायम चर्चेत राहणारी. त्यांचे रील आणि व्हिडीओ हे कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आणि मुख्य म्हणजे ते प्रेक्षकांच्याही तेवढेच पसंतीस उतरतात.नुकतेच रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख साईदरबारी गेल्याचा हा व्हिडीओ आहे. या लाडक्या जोडीला पाहायला मंदिर परिसरात लोकांनी प्रचंड गर्दी केल्याचही दिसत आहे.
रितेश आणि जिनिलिया मुलांसह साईचरणी नतमस्तक झाले. रितेशने साई समाधीचे मनोभावे दर्शन घेत विधीवत पूजाही केली. यावेळी रितेश आणि जिनिलिया हे पारंपारिक पोषाखात दिसले. तर मुलं रियान आणि राहिल यांनी साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलं. एवढच नाही तर दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे यांनी त्यांचा शाल व साईंची मुर्ती देवून सत्कारही केला.
रितेशकडून मुलाला संस्काराचे धडे
देशमुख कुटुंब साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. दरवर्षी साईदरबारी हे कुटुंब हजेरी लावतं. त्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी रितेशचे कौतुक केले आहे. कारण साई चरणी नतमस्तक होत असताना रितेश आपल्या लहान मुलाला हात जोडून दाखवत होता तसेच, देवाजवळ कसं नतमस्तक झालं पाहिजे हे त्याच्याकडून करून घेत होता.
मुलगा लहान आहे म्हणून त्याच्यापद्धतीने नमस्कार करू दे असा विचार न करता हात जोडून देवासमोर कसा नमस्कार करायला हवा हे तो करून दाखवत होता. म्हणजेच आपल्या मुलांना कसे संस्कार दिले पाहिजे हे नक्कीच रितेश आणि जिनिलिया नेहमीच प्रयत्न करतात ते यावेळीही दिसून आलं. हे पाहून नेटकऱ्यांनीही त्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
Housefull 5 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
रितेशच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याचा ‘हाऊसफूल 5’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. साजिद नाडियादवाला निर्मित Housefull 5 मध्ये दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे. तर जिनिलीया लवकरच आमिर खानच्या ‘सितारें जमीन पर’ चित्रपटात झळकणार आहे.2022 मध्ये ‘वेड’ हा तिचा पहिला मराठी सिनेमा होता . हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आता येत्या काळात रितेश-जिनिलीया पुन्हा एकत्र काम केव्हा करणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.