Gunmaster g9 box office collection : जिनिलिया देशमुखच्या ‘गनमास्टर जी 9’ला शर्वरी वाघच्या सिनेमाचं आव्हान; बॉक्स ऑफिसवर कोणाची कमाई जास्त?
जिनिलिया देशमुखचा गनमास्टर जी 9 आणि शर्वरी वाघ हिचा ये प्रेम मोल लिया' हे सिनेमे नुकतेच रिलीज झाले आहेत. बॉक्स ऑफिसच्या कमाईत या दोन्ही सिनेंमामध्ये मोठी चुरस पाहायला मिळते आहे. कोणाच्या चित्रपटाने किती कमावले आहेत जाणून घ्या

शर्वरी वाघ चा ये प्रेम मोल लिया आणि जिनिलियाचा गनमास्टर जी 9 हे दोन्ही चित्रपट 27 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाले. जिनिलिया देशमुख आणि शर्वरी वाघ यांच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळात आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईत ‘ये प्रेम मोल लिया’ ने आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या दिवशीचा सुरूवातीच्या आकडेवारीत कमाईत घट झाल्याचं दिसतं आहे.
सूरज बडजात्या दिग्दर्शित ये प्रेम मोल लिया हा कौटुंबिक आणि प्रेम कथेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात आयुष्यमान खुराना आणि शर्वरी मुख्य भूमिकेत आहेत. तर गनमास्टर जी 9 हा अॅक्शनपट असून त्यात इमरान हाश्मी आणि जिनीलिया देशमुख प्रमुख भूमिकेत आहेत.
पहिल्या दिवशी शर्वरीच्या चित्रपटाची आघाडी
पहिल्या दिवशी ये प्रेम मोल लिया ने भारतात सुमारे 4 कोटी रूपयांची निव्वळ कमाई केली. तर गनमास्टर जी 9 ने 3.65 कोटी रूपयांची कमाई केली. म्हणजेच पहिल्या दिवसाच्या कमाईत शर्वरीचा चित्रपट जिनिलियाच्या चित्रपटापेक्षा पुढे राहिला.
दुसऱ्या दिवशीच्या कमाईत काय घडलं
दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी सकाळच्या अंदाजानुसार ये प्रेम मोल लिया या चित्रपटाने 23 लाखांची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाची दोन दिवसांची कमाई निव्वळ 4. 23 कोटींवर पोहोचली. दुसरीकडे जिनिलियाच्या गनमास्टर जी 9 ने दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुमारे 20 लाख रूपये कमावले होते. या चित्रपटाची दोन दिवसांची एकूण कमाई 3.76 कोटी रूपयांपर्यंत पोहोचल्याचा सुरूवातीचा अंदाज होता. या आकडेवारीनुसार सध्या तरी शर्वरी वाघचा सिनेमा कमाईच्या बाबतीत पुढे आहे आता शनिवार आणि रविवारच्या सुट्टीत या दोन्ही चित्रपटांच्या कमाईत किती वाढ होते. याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.