Saba Pataudi: वयाच्या 27व्या वर्षी सैफ अली खानच्या बहिणीला ब्रेन ट्यूमर, भर रस्त्यात कोसळली
Saba Pataudi: पतौडी कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी सबा पतौडीने नुकताच एका पॉडकास्टमध्ये खळबळजनक खुलासा केला आहे. तिने वयाच्या 27व्या वर्षी तिच्यासोबत जे काही घडलं त्याने सर्वांनाच धक्का बसला...

जीवन कधीकधी एका क्षणात बदलते. ज्या दिवशी सर्वकाही सामान्य वाटते, त्याच्या पुढच्या क्षणी अशी बातमी मिळू शकते, जी माणसाला आतून हादरवून सोडते. काहीसे असेच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहिण सबा पतौडीसोबत घडले. अवघ्या २७व्या वर्षी तिला ब्रेन ट्यूमर असल्याचे समजले. यापूर्वी तिला कोणताही लक्षणे जाणावली नव्हती. एक दिवस ती आपल्या मैत्रिणीसोबत बाहेर गेली होती, पण मध्येच अचानक रस्त्यावर बेशुद्ध पडली. त्यानंतर तपासणी झाली आणि तिच्यासमोर जीवनातील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक उभे राहिले. अलीकडेच सबाने बहिण सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये या भयानक अनुभवाची आठवण सांगितली आहे.
सोहा अली खानच्या ‘ऑल अबाउट हर’ पॉडकास्टमध्ये सबा पतौडीने सांगितले की, तिला आरोग्याबाबत तक्रार जाणवत होती. सुरुवातीला तिला वाटले की पोटाच्या त्रासामुळे असे होत आहे. कारण तिचे पोट फार संवेदनशील असल्यामुळे तिला त्रास होत असे. पण बघता बघता ती बेशुद्ध झाली.
२० ते २५ मिनिटांत शुद्धीवर आली
सबाने सांगितले की, तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. तिने आपल्या मैत्रिणीला सांगितले की, तिला बरे वाटत नाही आणि घरी लगेच घरी गेले पाहिजे. त्यानंतर सर्वकाही अचानक धूसर झाले. जेव्हा ती शुद्धीवर आली, तेव्हा इमारतीच्या बाहेरच्या रस्त्यावर पडलेली होती. सबाच्या मते, पूर्णपणे शुद्धीवर येण्यासाठी तिला सुमारे २० ते २५ मिनिटे लागली. त्यानंतर तिची एमआरआय तपासणी करून घेण्यात आली. अहवालात तिच्या मेंदूच्या तिसऱ्या वेंट्रिकलमध्ये एक असामान्य चिन्ह दिसले. सुरुवातीला डॉक्टरांना कोलॉइड सिस्ट असल्याचा संशय आला. ही एक दुर्मिळ आणि कर्करोग नसलेली गाठ असते.
सबाने सांगितले की, एमआरआयच्या सुमारे सहा महिन्यांनंतर तिची शस्त्रक्रिया झाली. ऑपरेशनदरम्यान समोर आले की, तिला पायलोसाइटिक अॅस्ट्रोसाइटोमा नावाचा ब्रेन ट्यूमर होता. हा सामान्यतः हळूहळू वाढणारा, कमी ग्रेडचा ट्यूमर असतो. २७व्या वर्षी मेंदूच्या शस्त्रक्रियेची बातमी ऐकणे तिच्यासाठी अत्यंत कठीण होते. सबाने सांगितले की, या बातमीने तिला भावनिकदृष्ट्या तोडून टाकले होते. ती म्हणाली, ‘तुमचे जीवन अचानक सुन्न पडते, कारण त्यानंतर काहीही सामान्य वाटत नाही. एक दिवस तुम्ही बरे असता आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगितले जाते की तुमच्या मेंदूची शस्त्रक्रिया होणार आहे.’ सबा पुढे म्हणाली की, ही अपेंडिक्सच्या ऑपरेशनसारखी सामान्य शस्त्रक्रिया नव्हती. या बातमीने त्यांना आतून हादरवून सोडले होते, पण त्याचवेळी परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकदही दिली.