सचिन तेंडुलकर लग्नाआधी शिल्पाला करायचे डेट? अनेक वर्षांनंतर अभिनेत्री म्हणाली…
Sachin Tendulkar Love Life: लग्नाआधी सचिन तेंडुलकर प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पाला करायचे डेट! अभिनेत्रीकडून मोठं सत्य अखेर समोर..., खुद्द सचीन यांनी देखील अभिनेत्रीबद्दल केलं होतं मोठं वक्तव्य

क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पण आता सचिन यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली आहे. लग्नाआधी सचिन अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला डेट करायचे… असं अनेकदा समोर आलं. यावर खुद्द सचिन यांनी देखील मोठं वक्तव्य केलं होतं. आता अभिनेत्रीने अनेक वर्षांनंतर मोठं सत्य सांगितलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा हिची चर्चा रंगली आहे.
शिल्पा शिरोडकर आणि सचिन तेंडुलकर यांचं कनेक्शन
एका मुलाखतीत शिल्पा हिने सचीन यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला. ‘जेव्हा मी ‘हम’ सिनेमात काम करत होते. तेव्हा सचिनसोबत माझ्या नावाची चर्चा रंगली होती. माझी भाऊ आणि सचिन एकाच ठिकाणी राहत होते. वांद्रे पूर्वमध्ये माझा भाऊ आणि सचिन दोघे क्रिकेट खेळायचे. तेव्हा माझी आणि सचिन यांची ओळख झाली.’
शिल्पा पुढे म्हणाली, ‘सचिन आणि मी चांगले मित्र होतो आणि सचिन तेव्हा अंजलीला डेट करत होते. पण याबद्दल कोणाला काहीच माहिती नव्हतं. एक अभिनेत्री आणि क्रिकेटर भेटल्यानंतर लगेच आमच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला… सचिन म्हटलं की चर्चा तर होणारच… पण आमची एकदाच भेट झाली होती.’ असं देखील शिल्पा म्हणाली.
शिल्पा शिरोडकर सोबत असलेल्या नात्यावर सचिन यांनी देखील मौन सोडलं होतं…
एका मुलाखतीत सचिन यांना रिलेशनशिपबद्दल विचारण्यात आलं होतं. तुमच्या आयुष्यात सर्व मुर्खासारखी गोष्ट कोणती घडली होती. यावर सचिन म्हणाले, ‘सर्वात मुर्खासारखी गोष्ट म्हणजे, माझं आणि शिल्पा शिरोडकरच्या अफेअरच्या चर्चा….’ सचिन यांचं हे वक्तव्य तुफान व्हायरल झालं होतं.
अनिल कूपर यांच्या सोबत शिल्पाच्या नावाची चर्चा
शिल्पा हिचं नाव अभिनेते अनिल कपूर यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं होतं. रिपोर्टनुसार दोघे एकमेकांना डेट करत होते. पण अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यामुळे अनिल – शिल्पा यांचं घटस्फोट झालं… असं देखील सांगितलं जातं. आता शिल्पा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
सचिन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अंजली यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्यांनी मुलगी आणि मुलाचं आयुष्यात स्वागत केलं. सचिन यांची लेक सारा तेंडुलकर देखील कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
