भारतातील असं एक गाव… जिथे लग्नाआधी आत्म्यांना बोलावतात… आमंत्रित केलं नाही तर… कशी आहे ही अंगावर काटा उभी करणारी परंपरा?
भारतातील एका गावात अनोखी परंपरा आहे. गावातील प्रत्येकाच्या घरात आहे आत्म्यांचं घर, लग्नाआधी आत्म्यांना बोलावलं नाही तर, भारतातील एका गावात नको ते घडतं..., कशी आहे ही अंगावर काटा उभी करणारी परंपरा?

लहानपणी आपण सर्वांनाप आजी – आजोबांकडून भूताची गोष्ट ऐकली असेलच. कोणत्या एका निर्जन स्थळी आत्मा भटकते. शिवाय भूत घालवण्यासाठी हवन – किर्तन केलं जातं… असं दृष्य तुम्ही देखील अनेकदा पाहिलं असेल. पण कधी आत्मा पाहिली आहे का? आत्म्याची पूजा होताना पाहिली आहे का? छत्तीसगडमधील बस्तरमध्ये अबुझमदसह काही गावे आहेत जिथे आत्म्यांचं घर आहे, इतकंच नाही तर आत्म्यांचं घर आहे. परंतु, या गावांमध्ये आत्म्यांची पूजा देखील केली जाते.
बस्तरच्या अबुझमाड भागात, आदिवासी समुदायाचे लोक आत्म्यांना घर देतात आणि त्यांची पूजा करतात. ते आत्म्यांना आमंत्रित करतात आणि स्वतःच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. अबुझमाडच्या गावांमध्ये आत्म्यांना घर देण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. या गावातील लोक पितृ किंवा पितृ पक्षावर विश्वास ठेवत नाहीत. ते म्हणतात की, ते त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्यांना आत्मा घरात ठेवून त्यांची पूजा करतात. येथे पूर्वजांच्या आत्म्यांना भांड्यात ठेवून त्यांची पूजा केली जाते.
आत्म्यांची रोज केली जाते पूजा…
आदिवासी समाजात याला अना कुडमा म्हणतात. अना कुडमा म्हणजे आत्म्याचे घर. छत्तीसगड राज्य अनुसूचित जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष देवलाल दुग्गा यांनी या गावांबद्दल आणि आत्म्यांच्या पूजेबद्दल माहिती देताना सांगितलं की, आदिवासी समाजातील लोकांचा असा विश्वास आहे की, त्यांच्या पूर्वजांचे आत्मे येथे राहतात, ज्यांची ते रोज पूजा करतात.
आत्म्यांना केलं जांत आमंत्रित…
एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा गावात लग्न असतं तेव्हा पाहुण्यांच्या आधी आत्म्यांना आमंत्रित केलं जातं आणि नंतर ते आत्मे जोडप्याला आशीर्वाद देतात. यासोबतच, गावात नवीन पीक आत्म्यांना अर्पण केल्याशिवाय वापरलं जात नाही. जर कोणी चुकूनही असं केलं तर गावात संकट येतं. यानंतर, चूक मान्य केली जाते आणि प्रार्थना केली जाते.
देवलाल दुग्गा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी समाजातील लेकं ‘आना कुडमा’ यावर विश्वास ठेवतात. गावात मंदिराप्रमाणे एक छोटी खोली सारखं घर असतं. ज्यामध्ये एक मातीसारखी मडकं ठेवलेलं असतं. असं म्हटलं जातं की, आदिवासी समुदायाचे पूर्वज या मडक्यात राहतात. या गावांमधील प्रत्येक घरात पूर्वजांसाठी एक खोली आहे. आदिवासी गावांमध्ये एकाच कुळातील लोकांची संख्या जास्त असते.
आत्मा वाईट आत्म्यांपासून वाचवतात
देवलाल दुग्गा म्हणाले की, देव आत्म्यात राहतो. आदिवासी समाजातील लोक फक्त त्यांच्या पूर्वजांची पूजा करतात. सण किंवा लग्न असेल तेव्हा अत्म्यांची पूजा केली जाते आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मागितला जातो. पण या आत्म्यांच्या घरी फक्त पुरुषच जाऊ शकतात. महिला किंवा मुलींना येथे जाण्यास सक्त मनाई आहे. लग्नाच्या विधी देखील आत्म्यांना आमंत्रित केल्यानंतरच सुरू होतात.
