नशेत गर्लफ्रेंडला मारहाण करायचे राजेश खन्ना, रात्री 3 वाजता उठायचे आणि तिच्यासोबत… हैराण करणारं सत्य
Rajesh khanna Life: बायकोला घटस्फोट न देता गर्लफ्रेंडसोबत राहात होते राजेश खन्ना, नशेत रात्री 3 वाजता उठायचे आणि..., तिनेच सांगितलेलं हैराण करणारं सत्य

Rajesh khanna Life: दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्या निधनाला जवळपास 12 वर्ष झाली आहे. 18 जुलै 2012 मध्ये राजेश खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला. पण आजही त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगत असतात. राजेश खन्ना यांनी 1973 मध्ये अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत लग्न केलं. पण दोन मुलींच्या जन्मानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया लग्नाच्या काही वर्षांनंतर वेगळे झाले पण त्यांचा कधी घटस्फोट झाला नाही.
बायको सोडून गेल्यानंतर राजेश खन्ना यांनी गर्लफ्रेंड अनीता आडवाणी हिच्यासोबत राहण्यास सुरुवात केली. अनिता म्हणालेली, करवा चौथच्या वेळी त्यांच्यासाठी उपवास ठेवायची, परंतु तिने आरोप केला की ते कधीकधी तिचा शारीरिक छळ करायचा.
एका मुलाखतीत अनिताला तुम्ही दोघांनी लग्न का केलं नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘त्यांनी मला बालाजीसमोर एक कडा दिलेला. त्यांनी माझा स्वीकार केला होता… त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं. डिंपल यांनी देखील त्यांची साथ सोडली होती.’
राजेश खन्ना यांच्या स्वभावाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘ते रागीट होते छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्यांना राग यायचा. त्यांच्या स्वभावाबद्दल काहीही सांगू शकत नाही… ते मला मारायचे देखील. दारु प्यायल्यानंतर ते माझ्यावर अत्याचार करायते… दोन ड्रिंकनंतर असभ्य व्यवहार करायचे.’
‘संध्याकाळी 6.30 वाजता ते प्यायला बसायते… रात्री 3 वाजता उठायचे तेव्हा आनंदी असायचे. तेव्हा आम्ही बाहेर फिरायला देखील जायचो…मी त्याच्याशी भांडायची आणि वाद घालायची. पण त्यांनी मला ते समजावून सांगितलं. ते मला म्हणाले, ‘मी चुकीचा असलो तरी गप्प राहा’.
अनिता पुढे म्हणाली, “जेव्हा ते दारू पिऊन असायचे तेव्हा ते कधीकधी मला त्रास द्यायचे. पण जेव्हा तो नशेत नसायचे तेव्हा ते माझ्यासोबत राहण्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती होते…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.
राजेश खन्ना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला होता. ‘बाबूमोशाय, जिंदगी और मौत ऊपरवाले के हाथ हैं जहांपनाह।, हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं, जिनकी डोर ऊपरवाले की उंगलियों में बंधी हैं। असे अनेक डायलॉग आजही प्रसिद्ध आहेत…
