तारक मेहता… फेम माधवी भाभी आहे चेन स्मोकर? म्हणाली, ‘मला काहीही फरक पडत नाही कारण…’
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत साधी दिसणारी माधवी भाभी खऱ्या आयुष्यात आले चेन स्मोकर? स्वतःच म्हणाली, 'मला काहीही फरक पडत नाही कारण...'

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका गेल्या 17 वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. गेल्या काही वर्षात मालिकेत अनेक बदल झाले. पण मालिकेने मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करणं थांबवलं नाही. मालिकेतील नवीन कलाकार आणि जुने कलाकार देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. आता मालिकेत माधवी भाभी या भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री सोनालिका जोशी हिच्याबद्दल चर्चा सुरु आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत सोनालिका हिने तिच्याबद्दल पसरलेल्या अफवांबद्दल सांगितलं आहे.
सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी माधवी भाभी खऱ्या आयुष्यात चेन स्मोकर आहे… अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. यावर आता सोनालिका हिने स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनालिका हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
सोनालिका हिचे काही फोटो सोशल मीडीयावर तुफान व्हायरल झाले होते. ज्यामध्ये सोनालिका हिच्या हातात सिगरेट दिसली. तेव्हा लोकांना वाटलं मालिकेत साधी आणि सभ्य दिसणारी माधवी भाभी खऱ्या आयुष्याच चेन स्मोकर आहे. दरम्यान व्हायरल झालेल्या फोटोंवर सोनालिका हिने स्पष्टीकरण दिलं आहे.
सोनालिका म्हणाली, ‘मी फक्त सिगरेट पकडून बसली होती. मी कधीच स्मोक केललं नाही. फोटोमध्ये फक्त की एक स्टाइल होती. ते सुद्धा पोजसाठी… पण फोटो पाहिल्यानंतर लोकांना वाटलं की, मी रोज स्मोक करते. त्यानंतर युट्यूबवर नको त्या चर्चा होऊ लागल्या मी चेन स्मोकर आहे आणि माहिती काय काय…’
पुढे सोनालिका म्हणाली, ‘माझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं कुटुंब… माझं कुटुंबच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. माझ्या कुटुंबाला माहिती आहे की मी कशी आहे, तर बाकी लोकं माझ्याबद्दल काय बोलतात याचा मला काहीही फरक पडत नाही.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
ज्या फोटोमध्ये सोनालिका हातात सिगरेट घेऊल बसली होती. ते एक प्रॉपर फोटोशूट होतं. ‘मी मित्रांच्या ग्रुपसोबत सोनालिका म्हणून सिगरेत ओढताना नव्हती… जर समोरच्याला ते कळलं नाही, तर ती माझी चूक नाही…’ असं देखील सोनालिका म्हणाली होती.
अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, सोनालिका जोशी आणि समीर जोशी यांचं लग्न 2001 मध्ये झालं होतं. दोघांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव आर्या जोशी असं आहे. सोनालिका जोशी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
