My Vagina..; म्हणत अभिनेत्रीने ट्रोलर्सचं केलं तोंड बंद, नॉर्मल डिलिव्हरीवरून पेटला मुद्दा
'नॉर्मल डिलिव्हरी'वरुन सेलिब्रिटींला वादाला तोंड द्यावे लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. आता देखील 'नॉर्मल डिलिव्हरी' शब्दाचा वापर केल्यामुळे अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं, अशात अभिनेत्रीने ट्रोलर्सचं तोंड बंद केलं...

पूर्वी अभिनेत्री प्रेग्नेंसी आणि बाळाच्या जन्माबद्दल अनेक गोष्टी गुपित ठेवायच्या. पण आता अभिनेत्री प्रेग्नेंसी काळाबद्दल मोकळेपणाने स्वतःचा अनुभव आणि मत सांगत असतात. पण त्यावर अभिनेत्रींना ट्रोलिंगचा देखील सामना कराला लागतो. आता देखील असंच काही झालं आहे. अभिनेत्री ऋचा चड्ढा हिने लेक जुनेयरा एक वर्षाची झाल्यानंतर भावूक पोस्ट शेअर केली. प्रेग्नेंसीपासून मातृत्त्वाबद्दल अभिनेत्री आयुष्यात आलेल्या सुंदर क्षणांबद्दल स्वतःच्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या. पण लोकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं. कारण ऋचाने लिहिलं की तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे.
लेक एक वर्षची झाल्यानंतर ऋचा हिने जुन्या आठवणींचा एका व्हिडीओ शेअर करत आई झाल्याचा आनंद पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला. व्हिडीओ पोस्ट करत ऋचा कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘आयुष्या इतके रंग भरल्यामुळे… एक वर्षापूर्वी मी ब्रेच काँडी रुग्णालायात एक स्वस्थ मुलीला जन्म दिला. डिलिव्हरी फक्त 20 मिनिटांत झाली… नॉर्मल डिलिव्हरी! तेव्हापासून आयुष्य पूर्वीसारखं राहिलेलं नाही… विशेषतः माझ्यासाठी…’
‘मी पूर्णपणे बदलेली आहे… माझे विचार, माझं मन, माझं शरीर, माझी आत्मा… जुनेयरा एक वर्षापूर्वी जन्माला आली… माझा आई म्हणून पुनर्जन्म. एक पूर्णपणे नवीन अस्तित्व, पूर्वीपेक्षा वेगळे.’
View this post on Instagram
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या स्वप्नातील व्यक्तीसोबत एक नवीन जीवन आणि बाळ… हे आशीर्वाद नाही तर माहिती नाही काय आहे…’ सध्या ऋचाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पण ऋचाने पोस्टमध्ये वापरलेला ‘नॉर्मल डिलिव्हरी’ हा शब्द अनेकांना खटकला आहे. अनेकांनी अभिनेत्रीच्या पोस्टचं कौतुक केलं. पण अनेकांनी प्रश्न देखील उपस्थित केला. ज्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीवरून मुद्दा पेटला. पण अभिनेत्रीने सडतोड उत्तर देत ट्रोल करणाऱ्यांचं तोंड बंद केलं आहे.
ऋचाने ट्रोल करणाऱ्यांचं तोंड बंद केलं
ट्रोलर्सना रिचाने नॉर्मल डिलिव्हरी म्हटलं हे आवडलं नाही. एका नेटऱ्याने लिहिले, ‘प्रत्येक जन्म नैसर्गिक असतो, आजकाल प्रसूती विज्ञानाच्या मदतीने केली जाते.’ रिचाने लगेचच समर्पक उत्तर दिले, ‘मी ‘नॉर्मल डिलिव्हरी’ म्हटले असते तरी तुम्ही ते सांगितलं असतं.’
अन्य एक नेटकरी म्हाणाला, ‘व्हजायनल डिलिव्हरी म्हणायला हवं होतं…’ यावर ऋचा म्हणाली, ‘मला व्हजायनल डिलिव्हरी नाही म्हणायचं… माझी पोस्ट आहे, माझी बॉडी आहे, माझी योनी आणि माझं बाळ आहे… स्त्रीवादाने मला शिकवलं आहे की मी माझे शब्द स्वतः निवडू शकते.’ सध्या अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
नॉर्मल डिलिव्हरीवर पूर्वीही झालेला वाद…
‘नॉर्मल डिलिव्हरी’ या शब्दावरून एखाद्या सेलिब्रिटीला वादाला तोंड द्यावे लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही आठवड्यांपूर्वी, अभिनेते सुनील शेट्टी यांनी त्यांची मुलगी अथिया शेट्टी हिच्या सिझेरियन न करता बाळंतपणाच्या निर्णयाचे कौतुक केल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली.
