मुस्लिम मुलासोबत लग्न केल्यामुळे सोनाक्षीच्या कुटुंबियांमध्ये नाराजी? भाऊ म्हणाला, मला काही घेणं – देणं…
Sonakshi Sinha and Zaheer Iqbal: सोनाक्षीचं मुस्लिम मुलासोबत लग्न, कुटुंबात अद्यापही आहे नाराजी? अखेर अभिनेत्रीच्या भावाने सोडलं मौन, म्हणाला, मला काही घेणं - देणं..., सध्या सर्वत्र सोनाक्षीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं होतं. सोनाक्षी हिने मुस्लिम मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सिन्हा कुटुंबात नाराजी होती… अशी देखील चर्चा रंगली. शिवाय अभिनेत्रीच्या लग्नात भाऊ लव आणि कुश देखील सामिल नसल्याचं कळलं होतं. सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नाचे सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले पण कोणत्यात फोटोमध्ये अभिनेत्रीचे भाऊ दिसले नाहीत, अशात सोनाक्षी हिने दुसऱ्या धर्मात लग्न केलं… अशा चर्चांनी देखील जोर धरला.
दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीचा भाऊ कुश सिन्हा याने रंगणाऱ्या चर्चांवर मौन सोडलं आहे. शिवाय कुटुंबात नाराजी आणि तणाव होतं यावर देखील मोठं वक्तव्य केलं आहे. कुश म्हणाला, ‘मी अत्यंत साध्या प्रकारे आयुष्य जगतो. जर मला सत्य काय माहिती आहे, तर त्याबद्दल अनेक लोकं काय बोलतात, याचा मला काहीही फरक पडत नाही…’
सोनाक्षीच्या लग्नात दोन्ही भाऊ उपस्थित नव्हते… यावर कुश म्हणाला, ‘मला माहिती आहे नको त्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. जर कोणाला याबद्दल बोलायचं असेल तर ते बोलू शकतात, तो त्यांचा दृष्टीकोण आहे…. जर तुम्ही मला फोटोंमध्ये पाहिलं नसेल तर, असं नाही की लग्नात नव्हतो… प्रत्येक गोष्ट समोर येऊन दाखवण्याची काहीही गरज नाही…’
कुशने सोनाक्षीच्या वैयक्तिक निवडीला पाठिंबा दिला
सोनाक्षीच्या निवडीवर कुश म्हणाला, ‘मी तिच्या निर्णयाचा सन्मान करते. मला तिच्या रोजच्या आयुष्यात काहीही रस नाही. पण तिच्या निवडीचा मी सन्मान करतो. मी म्हटल्याप्रमाणे, ती एक प्रौढ आहे, ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिला स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. आमचे वडील नेहमी म्हणायचे, ती काहीही बेकायदेशीर करत नाहीये? ‘
कसं आहे कुश आणि झहीर इक्बाल यांचं नातं?
बहिणीच्या नवऱ्याबद्दल असलेल्या नात्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘आम्ही ठिक आहोत… मला त्याच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही.’, सोनाक्षी आणि झहीर यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, 23 जून 2024 मध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर सोनाक्षी आणि झहीर सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.
